Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

नगराध्यक्ष दालनाला कुलूप लावून गायब; देवळाली प्रवरात सैनिक पत्नीचे सहीसाठी धरणे ; नागरिकांत संताप

देवळाली प्रवरा : देशाच्या सीमेवर सैनिक लढतोय पण त्याच्या पत्नीला स्वतःच्या हक्कासाठी नगरपालिकेसमोर धरणे आंदोलन करावे लागतेय ही धक्कादायक घटना देवळाली प्रवरा येथे घडली आहे. आधार अपडेटसाठी आवश्यक सहीशिक्का मिळावा म्हणून वारंवार विनंती करूनही नगराध्यक्षांनी कागदपत्रे न दिल्याचा आरोप करत सैनिक पत्नी पूनम कदम यांनी थेट नगराध्यक्षांच्या दालनासमोर धरणे आंदोलन छेडले.  सैनिकाची पत्नी पूनम कदम यांनी सांगितले की, आधार अपडेटसाठी कागदपत्रावर लोकप्रतिनिधीचा सहीशिक्का आवश्यक होता. त्यासाठी नगराध्यक्ष सत्यजित कदम यांच्याकडे अनेक वेळा चकरा मारल्या मात्र पाणीपट्टी आंदोलनात सहभाग घेतल्याचा राग मनात ठेवून मुद्दाम कागदपत्रे अडवण्यात आली.  आज आंदोलन सुरू होताच नगराध्यक्षांनी दालनाला कुलूप लावले आणि पालिकेकडे फिरकलेही नाहीत. याला आंदोलनकर्त्यांनी “पळकूटेपणा” असल्याचा आरोप केला. आंदोलनकर्त्यांनी नगराध्यक्षांवर सैनिक पत्नीचा मानसिक छळ केल्याचा गंभीर आरोप करत संताप व्यक्त केला.“प्रजासत्ताक दिनी सैनिकांकडून ध्वजारोहण करून घेणे हा केवळ दिखावा आहे,” असा घणाघातही पुनम कदम यांनी केला आहे.  नगराध्यक्षांनी देवळाली प्रवराची राजकीय परंपरा मोडीत काढत सूडबुद्धीचे राजकारण सुरू केले असून जनतेची कामे करण्याऐवजी जनतेलाच वेठीस धरले जात असल्याचा आरोप सुरेंद्र थोरात यांनी केला.  देशासाठी लढणाऱ्या सैनिकाच्या पत्नीला आंदोलन करावे लागणे ही शरमेची बाब असून, नगराध्यक्ष वारंवार आंदोलनाच्या वेळी दालन बंद करून पळ काढतात असा आरोप करण्यात आला.कागदपत्रांबाबत स्पष्ट उत्तर न दिल्यास उपोषणाचा इशाराही  आप्पासाहेब ढुस यांनी दिला आहे.  सीमेवर देशसेवा करणाऱ्या सैनिकाच्या पत्नीला सहीसाठी तासन्तास बसवून ठेवणे अयोग्य असून, केवळ आंदोलनात सहभाग घेतल्यामुळे सूड उगवला जात असल्याचा आरोप नगरसेविका सुनिता थोरात यांनी केला.  या आंदोलनात नगरसेवक, विविध पक्षांचे पदाधिकारी तक्रारदार सैनीक पत्नी पूनम कदम यांचे समवेत नगरसेविका सुनीता थोरात, पल्लवी ढूस, नगरसेवक दासू पठारे, शरद वाळुंज, संतोष चोळके, डॉ तनपुरे कारखान्याचे संचालक कृष्णा मुसमाडे, अरूण ढूस, आर पी आय जिल्हा प्रमुख सुरेंद्र थोरात, आप्पासाहेब ढूस, प्रहार महिला शहर प्रमुख भाग्यश्री कदम, नाना उंडे आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.  आठ दिवसांत कागदपत्रे न दिल्यास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करण्याचा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला आहे.   पाणीपट्टी आंदोलनात सहभाग घेतल्याचा राग? सैनिकाची पत्नी पूनम कदम यांनी सांगितले की, आधार अपडेटसाठी कागदपत्रावर लोकप्रतिनिधीचा सहीशिक्का आवश्यक होता. त्यासाठी नगराध्यक्ष सत्यजित कदम यांच्याकडे अनेक वेळा चकरा मारल्या मात्र पाणीपट्टी आंदोलनात सहभाग घेतल्याचा राग मनात ठेवून मुद्दाम कागदपत्रे अडवण्यात आली असल्याचा आरोप त्यांनी केलाय.

पोलिसावर हल्ला करणाऱ्यांची शहरातून धिंड
ॲसिड हल्ल्यातील चिमुकलीला न्याय द्या; संगमनेरमध्ये भव्य रस्ता रोको ; कठोर शिक्षेची मागणी
रमजाननिमित्त खजूर वाटप; सर्वधर्म समभावाचा संदेश

देवळाली प्रवरा : देशाच्या सीमेवर सैनिक लढतोय पण त्याच्या पत्नीला स्वतःच्या हक्कासाठी नगरपालिकेसमोर धरणे आंदोलन करावे लागतेय ही धक्कादायक घटना देवळाली प्रवरा येथे घडली आहे. आधार अपडेटसाठी आवश्यक सहीशिक्का मिळावा म्हणून वारंवार विनंती करूनही नगराध्यक्षांनी कागदपत्रे न दिल्याचा आरोप करत सैनिक पत्नी पूनम कदम यांनी थेट नगराध्यक्षांच्या दालनासमोर धरणे आंदोलन छेडले.

 सैनिकाची पत्नी पूनम कदम यांनी सांगितले की, आधार अपडेटसाठी कागदपत्रावर लोकप्रतिनिधीचा सहीशिक्का आवश्यक होता. त्यासाठी नगराध्यक्ष सत्यजित कदम यांच्याकडे अनेक वेळा चकरा मारल्या मात्र पाणीपट्टी आंदोलनात सहभाग घेतल्याचा राग मनात ठेवून मुद्दाम कागदपत्रे अडवण्यात आली.

 आज आंदोलन सुरू होताच नगराध्यक्षांनी दालनाला कुलूप लावले आणि पालिकेकडे फिरकलेही नाहीत. याला आंदोलनकर्त्यांनी “पळकूटेपणा” असल्याचा आरोप केला. आंदोलनकर्त्यांनी नगराध्यक्षांवर सैनिक पत्नीचा मानसिक छळ केल्याचा गंभीर आरोप करत संताप व्यक्त केला.“प्रजासत्ताक दिनी सैनिकांकडून ध्वजारोहण करून घेणे हा केवळ दिखावा आहे,” असा घणाघातही पुनम कदम यांनी केला आहे.

 नगराध्यक्षांनी देवळाली प्रवराची राजकीय परंपरा मोडीत काढत सूडबुद्धीचे राजकारण सुरू केले असून जनतेची कामे करण्याऐवजी जनतेलाच वेठीस धरले जात असल्याचा आरोप सुरेंद्र थोरात यांनी केला.

 देशासाठी लढणाऱ्या सैनिकाच्या पत्नीला आंदोलन करावे लागणे ही शरमेची बाब असून, नगराध्यक्ष वारंवार आंदोलनाच्या वेळी दालन बंद करून पळ काढतात असा आरोप करण्यात आला.कागदपत्रांबाबत स्पष्ट उत्तर न दिल्यास उपोषणाचा इशाराही  आप्पासाहेब ढुस यांनी दिला आहे.

 सीमेवर देशसेवा करणाऱ्या सैनिकाच्या पत्नीला सहीसाठी तासन्तास बसवून ठेवणे अयोग्य असून, केवळ आंदोलनात सहभाग घेतल्यामुळे सूड उगवला जात असल्याचा आरोप नगरसेविका सुनिता थोरात यांनी केला.

 या आंदोलनात नगरसेवक, विविध पक्षांचे पदाधिकारी तक्रारदार सैनीक पत्नी पूनम कदम यांचे समवेत नगरसेविका सुनीता थोरात, पल्लवी ढूस, नगरसेवक दासू पठारे, शरद वाळुंज, संतोष चोळके, डॉ तनपुरे कारखान्याचे संचालक कृष्णा मुसमाडे, अरूण ढूस, आर पी आय जिल्हा प्रमुख सुरेंद्र थोरात, आप्पासाहेब ढूस, प्रहार महिला शहर प्रमुख भाग्यश्री कदम, नाना उंडे आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 आठ दिवसांत कागदपत्रे न दिल्यास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करण्याचा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला आहे. 

 पाणीपट्टी आंदोलनात सहभाग घेतल्याचा राग?

सैनिकाची पत्नी पूनम कदम यांनी सांगितले की, आधार अपडेटसाठी कागदपत्रावर लोकप्रतिनिधीचा सहीशिक्का आवश्यक होता. त्यासाठी नगराध्यक्ष सत्यजित कदम यांच्याकडे अनेक वेळा चकरा मारल्या मात्र पाणीपट्टी आंदोलनात सहभाग घेतल्याचा राग मनात ठेवून मुद्दाम कागदपत्रे अडवण्यात आली असल्याचा आरोप त्यांनी केलाय.

COMMENTS