नाशिक : यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठात भारतीय संविधान दिन उत्साहात साजरा करण्यात आला. मुख्य प्रशासकीय इमारतीत झालेल्या कार्यक्रमाच्
नाशिक : यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठात भारतीय संविधान दिन उत्साहात साजरा करण्यात आला. मुख्य प्रशासकीय इमारतीत झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे मा. कुलगुरू प्रा. संजीव सोनवणे होते. त्यांच्या नेतृत्वाखाली उपस्थित सर्वांनी भारताच्या संविधानाच्या उद्देशिकेचे सामुहिकरीत्या एकसुरात जाहीर वाचन केले. भारतीय नागरिक म्हणून संविधानाने दिलेल्या अधिकारांबाबत आपण जागरूक राहिले पाहिजे, त्याचबरोबर आपल्या कर्तव्यांची देखील जाणीव ठेवत कृती केली पाहिजे असे प्रतिपादन मा. कुलगुरू प्रा. संजीव सोनवणे यांनी याप्रसंगी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थी कल्याण व बहि:शाल केंद्राचे प्रमुख डॉ. दयाराम पवार यांनी केले. यावेळी प्र-कुलगुरू डॉ. जोगेंद्रसिंह बिसेन, प्रभारी कुलसचिव तथा वित्त अधिकारी डॉ. गोविंद कतलाकुटे, परीक्षा नियंत्रक श्री. भटूप्रसाद पाटील यांच्यासह विद्याशाखा संचालक, प्राध्यापक, प्रशासकीय अधिकारी – कर्मचारी, शैक्षणिक संयोजक, विद्यार्थी आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

COMMENTS