Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

जिल्हा परिषद अध्यक्ष चषक जिल्हास्तरीय स्पर्धांचे उदघाटन – १ हजार ४०० स्पर्धकांचा सहभाग

स्पर्धेच्या युगात प्रत्येक क्षेत्रात टिकुन राहण्यासाठी विद्यार्थ्यांनी शालेय जीवनापासुनच प्रयत्नशील राहावे - आशिमा मित्तल

नाशिक : स्पर्धेच्या युगात प्रत्येक क्षेत्रात टिकुन राहण्यासाठी विद्यार्थ्यांनी शालेय जीवनापासुनच प्रयत्नशील रहावे. आपली कला, संस्कृती व गुणवत्ता

मातोश्रीत कुणाला एन्ट्री नाही, मग राज्य कोण चालवतंय? | LOK News 24
गप्पा मारत मैत्रिणी निघाल्या अन् भरधाव वेगाने एकीला कारने उडवलं | LOK News 24
रेल्वे कर्मचाऱ्याची डोक्यात गोळी झाडून आत्महत्या | LOK News 24

नाशिक : स्पर्धेच्या युगात प्रत्येक क्षेत्रात टिकुन राहण्यासाठी विद्यार्थ्यांनी शालेय जीवनापासुनच प्रयत्नशील रहावे. आपली कला, संस्कृती व गुणवत्ता सिद्ध करून भविष्यात आपले करीअर  घडवावे तसेच प्रत्येक क्षेत्रात मिळणाऱ्या संधीचे सोने करावे, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी केले. नाशिक येथील स्व.मीनाताई ठाकरे विभागीय क्रीडा संकुलाच्या मैदानावर जिल्हा परिषद अध्यक्ष चषक स्पर्धा अतंर्गत जिल्हा स्तरीय कला, क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धाच्या उदघाटनाप्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी नाशिक जिल्हयातील पंधरा तालुक्यातील सुमारे १ हजार ४०० पेक्षा अधिक खेळाडू व प्रशिक्षक, संघ व्यवस्थापक , शिक्षक व पालकांनी उत्स्फुर्तपणे सहभाग नोंदवला.

जिल्हा परिषद अध्यक्ष चषक स्पर्धेच्या उदघाटनप्रसंगी सहभागी स्पर्धकांनी शानदार संचलन करुन प्रमुख पाहुण्यांना मानवंदना दिली यावेळी जेम्स इंग्लिश मेडियम स्कुलच्या बँड पथकांनी तालबध्द साथ दिली. संचलनाव्दारे ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळेतील खेळाडूंची शिस्तबध्दता व मुलांचा उत्साह दिसून आला. सहभागी खेळाडूंना उपलब्ध करुन देण्यात आलेल्या सर्व प्रकारच्या सोयी सुविधांची मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी प्रत्यक्ष पाहणी करुन समाधान व्यक्त केले. प्रत्यक्ष मैदानावर जावून खेळाडूंशी संवाद साधला. व नाणेफेक करुन प्रत्यक्ष स्पर्धाना प्रारंभ केला. याप्रसंगी उपमुख्य कार्यकारी अधिकारी (साप्रवि) रविंद्र परदेशी, प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी डॉ.नितीन बच्छाव, उपशिक्षणाधिकारी भास्कर कनोज,  अधिक्षक श्रीधर देवरे, धनंजय कोळी, निलेश पाटोळे, संतोष झोले, प्रशासन अधिकारी रविंद्र आंधळे, अनिल दराडे सर्व गटशिक्षणाधिकारी  व सर्धा प्रमुख उपस्थित होते.

अध्यक्ष चषक स्पर्धा दोन गटांमध्ये (लहान गट- इ. १ ली ते ५ वी व मोठा गट इ. ६ वी ते ८वी ) व १४ प्रकारात घेण्यात येत असून प्रत्येक सपर्धा प्रकारात तालुका स्तरावर प्रथम क्रमांक मिळवलेले स्पर्धक व संघ सहभागी झाले आहेत. आजच्या वेळापत्रकानुसार कबड्डी मुले-मुली , खोखो मुले-मुली, वक्तृत्व लहान व मोठा गट, वैयक्तीक गीतगायन लहान व मोठा गट, वैयक्तिक नृत्य लहान व मोठा गट, समुहगान लहान व मोठा गट, समुह नृत्य लहान गट, चित्रकला लहान व मोठा गट, बुध्दीबळ लहान व मोठा गट या स्पर्धा मोठया उत्साहात संपन्न झाल्या. दि ६ रोजी धावणे, समूहगीत गायन व समूहनृत्य मोठा गट, स्पेलिंग बी व दिव्यांग विदयार्थ्यांच्या स्पर्धा या ठिकाणी होणार आहेत. मा.ना. दादाजी भूसे (मंत्री सार्वजनिक बांधकाम, सार्वजनिक उपक्रम महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री नाशिक जिल्हा) यांचे प्रमुख उपस्थितीत पारितोषिक वितरण कार्यक्रम दि. ६ रोजी दुपारी ४ वाजता संपन्न होणार आहे.

COMMENTS