Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

स्वातंत्र्यपुर्व काळापासून सावरकरांच्या बदनामीचे षडयंत्र कायम-शरद पोंक्षे

पेशवा सेवाभावी संस्थेचा उपक्रम

अंबाजोगाई प्रतिनिधी - स्वातंत्र्यपुर्व काळपासून स्वातंत्र्यवीर विनायक दामोधर सावरकर यांच्या बदनामीचे षडयंत्र सुरूच आहे. ते आजही कायम आहे. केवळ ह

अहमदनगर जिल्ह्यातील 9 हजार 356 शेतकर्‍यांचे वीजबिल झाले कोरे
बुलढाणा पोलिसांनी महिनाभरात पकडले 91 वॉन्टेड आरोपी
दारुच्या नशेत कुऱ्हाडीने मोठ्या भावाची हत्या |

अंबाजोगाई प्रतिनिधी – स्वातंत्र्यपुर्व काळपासून स्वातंत्र्यवीर विनायक दामोधर सावरकर यांच्या बदनामीचे षडयंत्र सुरूच आहे. ते आजही कायम आहे. केवळ हिंदु स्वतंत्र हिंदु राष्ट्राची संकल्पना सावरकरांनी मांडली व त्याला विरोध म्हणून हे षडयंत्र असल्याचे प्रसिद्ध अभिनेते तथा विचारवंत शरद पोंक्षे यांनी यावेळी आपल्या व्याख्यानात सांगितले.
येथील पेशवा सेवाभावी संस्थेच्या वतीने भगवान परशुराम जन्मोत्सवानिमित्त आद्यकवी मुकुंदराज सभागृहात ‘वि.दा.सावरकरांचे जिवन व विचार दर्शन’ या विषयावर शरद पोंक्षे यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आ.नमिता मुंदडा होत्या तर व्यासपीठावर माजी नगराध्यक्ष राजकिशोर मोदी, संयोजन समितीचे अध्यक्ष डॉ.अतुल देशपांडे, दिनदयाळ बँकेचे अध्यक्ष अ‍ॅड.मकरंद पत्की, पेशवा संघटनेचे सचिव शैलेश कुलकर्णी, रंगनाथ वैद्य, अ‍ॅड.कल्याणी विर्धे, ऋषीकेश लोमटे उपस्थिती होते. यावेळी बोलताना शरद पोंक्षे म्हणाले की, स्वातंत्र्यपुर्व काळापासून स्वातंत्र्यवीर सावरकर यांना विविध माध्यमातून डावलण्याचीच भूमिका झाली. त्यांच्या हिंदु राष्ट्र संकल्पनेला विविध विचारांनी सातत्याने छेद दिला. परिणामी हि त्यांची भूमिका अडगळीत पडेल असे वाटत असतानाच गेल्या शंभरापेक्षा जास्त वर्षापासुन हिंदु राष्ट्राचा धगधगता विचार आजही ज्वलंत असल्याचे शरद पोंक्षे यांनी सांगितले. भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात त्याग, समर्पन व राष्ट्रप्रेम याचे ते मुर्तीमंत उदाहरण आहेत. यावेळी पोंक्षे यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या विविध पैलुंचे दर्शन आपल्या व्याख्यानातून उपस्थितीतांना उलगडुन सांगितले. कार्यक्रमाची सुरूवात दिपप्रज्वलन व सावरकर यांच्या प्रतिमा पुजनाने झाली. ओमकार रापतवार व त्यांच्या संचाने जयस्तुते हे गीत सादर केले. उपस्थितीत पाहुण्यांचे स्वागत पेशवा सेवाभावी संस्थेच्या वतीने करण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ.अतुल देशपांडे यांनी केले. संचलन प्रा.रोहिणी पाठक यांनी तर उपस्थितांचे आभार शैलेश कुलकर्णी यांनी मानले. वंदे मातरम ने कार्यक्रमाची सांगता झाली.

COMMENTS