Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

न्यू व्हिजन पब्लिक स्कूल येथे महाराष्ट्र दिन उत्सहात साजरा

अंबाजोगाई प्रतिनिधी - अंबाजोगाई शहरातील श्री बालाजी शिक्षण प्रसारक मंडळाच्या न्यू व्हिजन पब्लिक स्कूल येथे दि.1 मे रोजी 63 वा महाराष्ट्र दिन उत्स

या शहरांसाठी दिवाळी असेल खास.
गृहमंत्र्यांच्या शहरात दोन व्यापार्‍यांची हत्या
‘चांद्रयान’ मोहिमेचे यश हा देशाच्या शिरपेचात मानाचा तुरा; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उत्स्फूर्त भावना 

अंबाजोगाई प्रतिनिधी – अंबाजोगाई शहरातील श्री बालाजी शिक्षण प्रसारक मंडळाच्या न्यू व्हिजन पब्लिक स्कूल येथे दि.1 मे रोजी 63 वा महाराष्ट्र दिन उत्सहात साजरा करण्यात आला.याप्रसंगी प्रथम कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी धनराज सोळंकी यांच्या हस्ते  झेंडावंदन करण्यात आले. राष्ट्रध्वजाला राष्ट्रगीताने मानवंदना देऊन शाळेच्या संगीत समूहाने जय जय महाराष्ट्र माझा हे  महाराष्ट्र गीत सादर केले.
त्यानंतर इयत्ता 10 चा विद्यार्थी सौदागर बडे या विद्यार्थ्यांने उत्तमरित्या महाराष्ट्र दिनानिमित्त आपले मनोगत व्यक्त केले.त्यानंतर डलळशपलश जश्रूाळिरव तर्फे घेण्यात आलेल्या खचज (ळपींशीपरींळेपरश्र चरींहशारींळली जश्रूाळिरव) स्पर्धेचे बक्षीस वितरण करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी धनराज सोळंकी यांनी याप्रसंगी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्यात त्यांनी सांगितले की 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीची मुहूर्तमेढ  तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते रोवली गेली. परंतु तत्पूर्वी महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीसाठी झालेल्या विविध आंदोलनामध्ये अनेक हुतात्म्यांनी आपल्या प्राणाचे बलिदान दिले. महाराष्ट्र राज्य निर्मिती साठी बलिदान दिलेल्या हुतात्म्यांचे स्मरण या दिवशी केले जाते.तसेच 1 मे हा दिवस कामगारांना व कामगार संघटनांना प्रोत्साहित करण्यासाठी व त्यांचे योगदान अधिरेखीत करण्यासाठी साजरा केला जात असल्याचे देखील धनराज सोळंकी यांनी याप्रसंगी नमूद केले. शाळेचे  प्राचार्य प्रवीण शेळके यांनी  महाराष्ट्र दिनाविषयी आपले मनोगत व्यक्त केले. ते म्हणाले की आपला भारत देश हा कृषिप्रधान देश म्हणून ओळखला जातो संतांची भूमी असलेले राज्य म्हणून महाराष्ट्र राज्याचा उल्लेख केला जातो. प्रत्येक विद्यार्थ्यांनी डोळ्यासमोर एक उद्दिष्ट ठेवले पाहिजे व ते उद्दिष्ट गाठण्यासाठी सतत संघर्ष करणे गरजेचे आहे. अशा प्रकारचे प्रेरणादायी व संघर्षमय विचार प्राचार्य शेळके यांनी विद्यार्थ्यांसमोर मांडले. 1 मे महाराष्ट्र दिन व कामगार दिनानिमित्त संस्थेचे संस्थापक राजकिशोर मोदी, माजी आमदार पृथ्वीराज साठे, धनराज सोळंकी, संस्थेचे कार्यकारी संचालक संकेत मोदी, संस्थेचे सल्लागार वसंत चव्हाण, भूषण मोदी , डॉ.दामोदर थोरात,  माजी नगरसेवक अमोल लोमटे, डॉ.नवनाथ घुगे ,फार्मसी कॉलेज प्राचार्य डॉ.मृणाल सिरसाट,   डॉ.संतोष तरके, बीएड अध्यापक महाविद्यालय प्राचार्य नंदकिशोर फुलारी, डॉ.तपस्या गुप्ता, सविता बनाळे , विनायक मुंजे,तसेच शाळेचे प्राचार्य प्रवीण शेळके  तसेच शाळेचे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वृंद यांची उपस्थिती होती.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हेमलता मस्के, अब्दुल रहमान व तनिष्का बचुटे यांनी केले तर उपस्थित सर्वांचे आभार कु. श्वेता बागल या विद्यार्थिनीने व्यक्त केले.

COMMENTS