Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

राज्यात काँगे्रसला पडणार खिंडार ?

आमदार संजय शिरसाट यांचे वक्तव्य

मुंबई/प्रतिनिधी ः महाराष्ट्राच्या राजकारणात प्रचंड उलथापालथी सुरू असतांनाच, शिवसेना अर्थात शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी महाराष्ट्राच्या रा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे रक्ताने रेखाटलेले चित्र .
संजय शिरसाठ यांच ट्विट म्हणजे त्यांच्या आंतरातम्याचा आवाज.
ड्रग्ज प्रकरणात आमदार-खासदारांचा समावेश

मुंबई/प्रतिनिधी ः महाराष्ट्राच्या राजकारणात प्रचंड उलथापालथी सुरू असतांनाच, शिवसेना अर्थात शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात आणखी काही राजकीय बॉम्ब फुटणार असल्याचे वक्तव्य केले आहे. महाराष्ट्रात आणखी एक गट सत्तेत येईल. काँग्रेसचे 16 ते 17 आमदार संपर्कात आहेत, असे विधान शिरसाट यांनी केले आहे.
आणखी एक गट सत्तेत येण्यास इच्छूक आहे. काँग्रेसचे 16-17 आमदार संपर्कात आहेत, असे बोलले जात आहे, यामध्ये किती तथ्य आहे? असे विचारले असता संजय शिरसाट म्हणाले, काँग्रेस पक्ष फुटणार आहे, हे नक्की आहे. राज्याच्या मंत्रिमंडळाचा विस्तारही लवकर होणार आहे. त्यामध्ये शिवसेना आणि भाजपाच्या आमदारांना मंत्रिपदे  दिली जातील, हेही तेवढेच सत्य आहे. काँग्रेस कधी फुटतेय आणि ते कधी सत्तेत येतात? यासाठी थोडी वाट पाहावी लागेल. पण काँग्रेस फुटणार आहे, हे नक्की आहे. काही काळानंतर काँग्रेसही आमच्याबरोबर दिसेल, असेही शिरसाट म्हणाले. शिरसाट यांच्या विधानामुळे पुन्हा राज्यात राजकीय भूकंप होणार का? आणि काँग्रेसमधील कोणता गट शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील होणार? याबाबत तर्क-वितर्क लावले जात आहेत.

COMMENTS