आरबीआयच्या पथकाकडून ’नगर अर्बन’मध्ये तपासणी

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

आरबीआयच्या पथकाकडून ’नगर अर्बन’मध्ये तपासणी

अहमदनगर/प्रतिनिधी : येथील नगर अर्बन मल्टीस्टेट शेड्युल्ड को-ऑपरेटिव्ह बँकेत कर्ज प्रकरणात अनेक घोटाळे उघड झाले आहेत. या पार्श्‍वभूमीवर गुरुवारी अचानक

मराठा आरक्षणाच्या आंदोलनात नक्षलवाद्यांनी घेतली उडी l पहा LokNews24
BREAKING: नरेंद्र मोदी आणि अमित शाह संविधान बदलण्याच्या तयारीत | Lok News24
पाणी फाउंडेशनच्या कार्यक्रमात राहुरी विद्यापीठातील शास्त्रज्ञांचा गौरव

अहमदनगर/प्रतिनिधी : येथील नगर अर्बन मल्टीस्टेट शेड्युल्ड को-ऑपरेटिव्ह बँकेत कर्ज प्रकरणात अनेक घोटाळे उघड झाले आहेत. या पार्श्‍वभूमीवर गुरुवारी अचानक रिझर्व्ह बँकेच्या (आरबीआय) नऊ अधिकार्‍यांचे पथक बँकेमध्ये दाखल झाले असून त्यांनी बँकेच्या परिस्थितीची माहिती घेण्यास सुरुवात आहे. अचानक सुरू झालेल्या या तपासणीमुळे खळबळ उडाली आहे. मात्र, या संदर्भात कोणीही थेट बोलायला तयार नाही. दरम्यान, नगर अर्बन बँकेच्या ठेवीदारांना रिझर्व्ह बँकेच्या अखत्यारितील डिपॉझिट इन्शुरन्स अ‍ॅण्ड क्रेडीट गॅरंटी कार्पोरेशन (डीआयसीसी) या संस्थेच्या माध्यमातून 5 लाखापर्यंतची ठेव रक्कम परत मिळणार आहे व यासाठी सुमारे 8 हजारावर ठेवीदारांचे अर्ज बँकेकडे आले आहेत.
नगर अर्बन मल्टिस्टेट बँकेच्या संदर्भामध्ये अनेक घोटाळे उघड झालेले आहेत. या घोटाळ्याची सध्या चौकशी विविध माध्यमातून सुरु आहे. तर काही प्रकरणे न्यायप्रविष्ट आहेत. नगर अर्बन बँकेसंदर्भामध्ये आरबीआयकडे तसेच केंद्र सरकारकडे विविध प्रकारच्या तक्रारी झाल्यामुळे बँकेवर गेल्या दोन वर्षापासून प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली होती. मागील महिन्यामध्ये निवडणूक प्रक्रिया पार पडली व नव्याने संचालक मंडळ कारभार पाहत आहे. नव्या संचालक मंडळामध्ये अनेक माजी संचालकांही समावेश आहे. बँकेची आर्थिक परिस्थिती खालावल्यामुळे प्रशासक नेमण्यात आलेला होता. त्यावेळी अनेक बंधने या बँकेवर घालण्यात आली होती. त्यानंतर संचालक मंडख सत्तेवर आल्यावरही आणखी काही बंधने घालण्यात आली आहेत. यामध्ये आर्थिक बंधने सुद्धा मोठ्या प्रमाणावर आहेत. तसेच बँकेने दररोजचा ताळेबंद हा आरबीआयला द्यावा, असे निर्देश सुद्धा देण्यात आले आहेत. सहा महिन्यात व फक्त 10 हजार रुपयांची मर्यादा असल्याने सध्या सर्वसामान्य खातेदारांना या बँकेतून स्वतःचे पैसे काढणे सुद्धा मुश्किल झालेले आहे. निर्बंध असल्यामुळे अनेकांचे पैसे अडकून पडले आहेत. या सर्व प्रकारामुळे बँकेच्या कारभारावर प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे. या पार्श्‍वभूमीवर रिझर्व्ह बँकेचे पथक नगरला आल्याने उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे.

बोलण्यास अनेकांचा नकार
शंभर कोटीहून अधिक रुपयांच्या कर्ज प्रकरणाचा घोळ बँकेत उजेडात आलेला आहे. पुणे व नगर याठिकाणी विविध प्रकारचे गुन्हे सुद्धा याबाबत दाखल झाले आहेत. त्याची सध्या चौकशी सुरू आहेत. तर काही न्यायप्रविष्ट आहेत. मागील एका गुन्ह्यासंदर्भात नुकतेच नगर येथी न्यायप्रक्रियेत आजी-माजी संचालक हजर न राहिल्यामुळे तीसहून अधिक जणांना कोर्टाने अजामीनपात्र वॉरंट बजावले होते. अशा सगळ्या पार्श्‍वभूमीवर, नगर अर्बन बँकेची सद्य परिस्थिती पाहता या बँकेचे निर्बंध दिवसेंदिवस वाढत गेल्यामुळे खातेदार चिंताग्रस्त आहे. त्यातच आरबीआयचे अनेक अधिकारी बँकेमध्ये दाखल झाल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. सकाळपासून अंतर्गत बैठका घेण्यास सुरुवात झाली आहे. बँकेची सद्यस्थिती काय आहे व नेमक्या ठेवी किती आहेत, तसेच कर्ज प्रकरणांमध्ये किती पैसे येणे बाकी आहे, यासह विविध प्रकारची माहिती सुद्धा त्यांनी घेण्यास सुरुवात केली आहेत. अनेक अधिकारी आल्यानंतर थेट यासंदर्भामध्ये बोलण्यास अनेकांनी नकार दिलेला आहे. पण शहरात चर्चा मात्र अनेकविध सुरू आहेत.

बँकेत 8 हजारावर अर्ज
रिझर्व्ह बँकेच्या अखत्यारितील डिपॉझिट इन्शुरन्स अ‍ॅण्ड क्रेडीट गॅरंटी कार्पोरेशन (डीआयसीसी) या संस्थेच्या माध्यमातून नगर अर्बन बँकेच्या ठेवीदारांना 5 लाखापर्यंतची ठेव रक्कम परत मिळणार आहे व यासाठी सुमारे 8 हजारावर ठेवीदारांचे अर्ज बँकेकडे आले आहेत. अर्बन बँकेत अर्ज सादर करण्यासाठी ठेवीदारांनी धाव घेतली होती. यासाठी दि. 19 जानेवारीपर्यंत मुदत होती. या मुदतीत बँकेत 8 हजारावर अर्ज सादर झाले आहेत. नगर अर्बन बँकेवर रिझर्व्ह बँकेवर सहा महिन्यांकरीता आर्थिक निर्बंध आणले आहेत. त्यामुळे ठेवीदार धास्तावले असताना रिझर्व्ह बँकेच्या नव्या आदेशानुसार ठेवीदारांना पाच लाख रुपयांपर्यंतच्या ठेवीची रक्कम 90 दिवसात मिळणार आहे. त्यासाठी ठेवीदारांना विहित नमुन्यातील अर्ज सादर करावा लागला. शिवाय केवायसी पडताळणी तसेच आवश्यक कागदपत्र या अर्जासोबत जोडावे लागले आहेत. यामुळे येत्या दि. 5 मार्चपर्यंत पाच लाख रुपयांपर्यंतची रक्कम ठेवीदारांच्या अन्य बँक खात्यात जमा होऊ शकणार आहे.

COMMENTS