Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कराड विकास सोसायटीत काँग्रेस-राष्ट्रवादीत होणार टक्कर; संचालक मंडळात कोण मंत्री की मंत्री पुत्र?

सातारा : जिल्हा बँकेच्या निवडणुकीत कराड सोसायटी मतदारसंघात सहकारमंत्री बाळासाहेब पाटील व विलासराव पाटील-उंडाळकरांचे सुपुत्र अ‍ॅड. उदयसिंह पाटील यांच्

फलटणमध्ये वाळू वाहतुक तस्करावरावर कारवाई; 10 लाखांचा मुद्देमाल जप्त
फलटण तालुक्यात जुगार अड्ड्यावर छापा; साडेचार लाखाचा मुद्देमाल जप्त
कालिकाईसह संपर्क अ‍ॅग्रोच्या कोट्यवधी फसवणूकप्रकरणी तीन संचालकांना अटक; सातारा अर्थिक गुन्हे शाखेची कारवाई

सातारा : जिल्हा बँकेच्या निवडणुकीत कराड सोसायटी मतदारसंघात सहकारमंत्री बाळासाहेब पाटील व विलासराव पाटील-उंडाळकरांचे सुपुत्र अ‍ॅड. उदयसिंह पाटील यांच्यात काट्याची व प्रतिष्ठेची लढत होत आहे. दोघांनीही थेट मतदारांशी संपर्कावर भर दिला आहे. सहकारमंत्र्यांना उदयसिंह पाटील रोखणार का, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
जिल्हा बँकेची निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेसच्या सहकार पॅनेलमधून लढवण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. अर्ज माघारीच्या दिवशी 21 पैकी 10 संचालक बिनविरोध निवडून आले. बँकेचे कामकाज चांगल्या प्रकारे सुरू असल्याने गेल्या वर्षीपेक्षा चांगली प्रगती आहे. उर्वरित 11 संचालकांच्या जागांसाठी निवडणूक होत आहे. सर्वसामान्य शेतकर्‍यांना न्याय देण्यासाठी मी निवडणुकीला सामोरे जात आहे, असे स्पष्ट मत सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांनी व्यक्त केले.
दिवंगत माजी मंत्री विलासराव पाटील-उंडाळकर यांनी गेली 50-55 वर्षे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक पदी काम केले. त्यांनी जे काम उभे केले ते मला पुढे न्यायचे आहे. त्यासाठी मी निवडणूक लढवत आहे. किसन वीर आबांपासूनची जिल्हा बँकेत संचालकांच्या नंतर त्यांच्या वारसदाराला संचालक म्हणून सामावून घेण्याची परंपरा काकांच्याबाबत राष्ट्रवादीच्या नेत्यांनी पाळली नाही. त्याला माझा विरोध असल्याचे कराड सोसायटी मतदारसंघातील जिल्हा बँकेची निवडणूक लढणारे अ‍ॅड. उदयसिंह पाटील-उंडाळकर यांनी स्पष्ट केले आहे.

COMMENTS