Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

हेलिकॉप्टर अपघात टाळण्यासाठी काटकसरीचा नको : आ. पृथ्वीराज चव्हाण यांचा सल्ला

कराड / प्रतिनिधी : तामिळनाडू येथे हेलिकॉप्टरच्या अपघातात सैन्याच्या सर्वोच्च पदावरील अधिकारी, त्यांच्या वरिष्ठ सैनिक अधिकार्‍यांचा दुर्देवी मृत्य

कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई यांच्या राजीनाम्याची मागणी
’गाळ मुक्त तलाव गाळयुक्त शिवार’ योजना गेली कुणीकडे?
खोडशीजवळ इनोव्हाची रिक्षाला जोराची धडक : गोटेतील 1 ठार

कराड / प्रतिनिधी : तामिळनाडू येथे हेलिकॉप्टरच्या अपघातात सैन्याच्या सर्वोच्च पदावरील अधिकारी, त्यांच्या वरिष्ठ सैनिक अधिकार्‍यांचा दुर्देवी मृत्यू झाला. असे प्रकार घडू नये, यासाठी अति महत्वाच्या व्यक्तीसाठी सुरक्षित हेलिकॉप्टर असावीत. त्यात काटकसर करून उपयोग नाही. पाच ते सात हजार कोटींची विमाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महत्वाच्या व्यक्तींसाठी घेतली आहेत. त्या प्रमाणे हेलिकॉप्टर देखील चांगल्या दर्जाची व सुरक्षीत उपकरणे असलेली घेण्याची गरज आहे, असे मत माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी मांडले.
तामीळनाडू येथे जनरल बिपीन रावत यांच्यासह चौदाजणांचा हेलिकॉप्टरच्या अपघातात अंत झाला. याबाबत आ. चव्हाण यांनी प्रतिक्रीया दिली. आ. चव्हाण म्हणाले, अपघाताची घटना दुर्देवी आहे. सैन्य दलातील सर्वोच्च पदावरील अधिकार्‍यांचे निधन धक्कादायक आहे. खरे म्हणजे त्यांचे हेलिकॉप्टर व्हीआयपी ड्युटीसाटी वापरले जाणारे रशीयन बनावटीचे आहे. ते सुरक्षीत हेलिकॉप्टर समजले जाते. त्याला खूप ताकदीची दोन दोन इंजीन आहेत. त्यामुळे इंजीन बंद पडण्याचा प्रकार कधी होत नाही.
मात्र, कुठेतरी कमी उंचीवर उतरताना झाडाला धडकल्याने अपघात झाला असावा. धुक दाट असल्याने समोरचे कमी दिसते अशात पाऊसही होता. अशा हवामानात उड्डाण करायला पाहिजे होते का?, ते टाळता आले असते का? असे यातून अनेक प्रश्‍न निर्माण होतात. त्या सगळ्याची चौकशी होईल. त्यातून खर काय घडले ते बाहेर येईल. मात्र, असे बर्‍याच वेळा घडते. दबाव असतो, आपण गेलेच पाहिजे. कार्यक्रम महत्वाचे असतात. व्हीयपींना किंवा राजकीय व्हीआयपी महत्वाचे असतात. त्यामुळे आपण थोडी रिस्क घेवून पाहूया, असा निर्णय होतो. वैमानिक यासाठी तयार नसतात. मात्र त्यांच्यावर दबाव टाकून त्यांना तयार केले जाते.
ऑगस्ट वेस्टलॅन्ड कंपनीडून हेलिकॉप्टर घेण्याचा प्रयत्न केला. त्यात दलालीचा देण्याचा प्रयत्न झाल्याने ती ऑर्डर रद्द झाली. त्यातून काही हेलिकॉप्टर आली. मात्र, ती वापरली जात नाहीत. मात्र, येथून पुढे तरी अती सुरेक्षेची हेलिकॉप्टर घेण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे. पंतप्रधान मोदींनी 5 ते 7 हजार कोटींची अती सुरक्षेची विमाने स्वतःसाठी घेतली आहेत. त्या प्रमाणे हेलिकॉप्टर घ्यायलाच हवीत. त्यात काटकसर करून उपयोग नाही. सुरक्षीत उपकरणांची हेलिकॉप्टर हवीत त्याबाबत गांभीर्याने विचार व्हावा. हेलिकॉप्टर अपघातात यापूर्वी देशाने जगनमहोन रेड्डी, माधवराव सिंदीयासरखे नेते योग्य हवामान नसताना उड्डाण भरल्याने अपघात होवून गमावले आहे. वास्तविक ते टाळता येण्यासारखे अपघात आहेत. त्याकरीता काटेकोर प्रोटोकॉल प्रस्थपीत झाला पाहिजे. त्यामध्ये पंतप्रधान मोंदी यांनी स्वतः लक्ष घातले पाहिजे. कारण येणारा दबाव टाळता आला पाहिजे. रशियन हेलिकॉप्टरची पॉवर फुल्ल इंजीन असले तरी त्यात रडारसाठी लागणारी इलेक्ट्रॉनिक्स उपकरणे पॉवर फुल नाहीत. त्या पध्दतीने बदल करून तशी हेलिकॉप्टर खरेदी करावीत. त्यात काटकसर करू नये.

COMMENTS