हल्ल्यात आ. नितेश राणे यांचा संबंध नाही – नारायण राणे

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

हल्ल्यात आ. नितेश राणे यांचा संबंध नाही – नारायण राणे

सिंधुदुर्ग : सिंधुदुर्गात राज्याचे अतिरिक्त पोलीस महासंचालक येतात. राज्यभरातील पोलीस येथे तैनात केले जातात. येथे एवढं असं काय घडलंय की प्रचंड पोलीस फ

नोरा-सिद्धार्थच्या बोल्ड केमिस्ट्रीने जिंकली चाहत्यांची मने
पनवेलमध्ये अल्पवयीन मुलीवर सलग दोन वर्ष अत्याचार
नोकरीचे आमिष दाखवून बांगलादेशी मुलीची बुधवार पेठेत विक्री

सिंधुदुर्ग : सिंधुदुर्गात राज्याचे अतिरिक्त पोलीस महासंचालक येतात. राज्यभरातील पोलीस येथे तैनात केले जातात. येथे एवढं असं काय घडलंय की प्रचंड पोलीस फौजफाटा तैनात केला जातोय ? असा सवाल केंद्रीयमंत्री नारायण राणे यांनी आज उपस्थित केला. संतोष परब हल्ला प्रकरणात आमदार नितेश राणे यांचा काही संबंध नाही, तसेच एखाद्या व्यक्तीला साधं खरचटलं असेल तर ३०७ सारखं कलम लावलं जातं असेल तसेच आमदार नितेश राणे यांचा मारहाणीत सहभाग नसताना त्यांना आरोपी केले जात आहे ही बाब चुकीची आहे. आमच्यावर अन्याय झाला तर आम्ही हायकोर्ट, सुप्रीम कोर्टात दाद मागू, असेही राणे यांनी आज स्पष्ट केले.कणकवली येथील प्रहार भवन येथे राणे यांनी पत्रकार पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे दिली. यावेळी माजी राज्यमंत्री रवींद्र चव्हाण, भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली उपस्थित होते.

COMMENTS