Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

लातूरमध्ये एसटी पुलावरुन कोसळली

14 प्रवासी गंभीर जखमी; बसचा स्टेरिंग रॉड तुटल्याने अपघात

लातूर ः  लातूरमध्ये एसटी बस थेट पुलावरुन कोसळल्याची घटना घडली आहे. या अपघातात 42 प्रवासी जखमी झाले आहेत. तर, 14 जण गंभीर आहेत. जखमींवर मुरुड ग्रा

खैरेंचा खुंटा उपटू शकतो
३५० सोन्याच्या होनांनी होणार ३५० वा शिवराज्याभिषेक सोहळा संपन्न
ईडीच्या रडारवर बॉलीवूडचे कलाकार

लातूर ः  लातूरमध्ये एसटी बस थेट पुलावरुन कोसळल्याची घटना घडली आहे. या अपघातात 42 प्रवासी जखमी झाले आहेत. तर, 14 जण गंभीर आहेत. जखमींवर मुरुड ग्रामीण रुग्णायात उपचार सुरू आहेत. लातूरहून ही एसटी पुण्याच्या दिशेने निघाली होती. मात्र, सकाळी 8 वाजेच्या सुमारास बसचा स्टेरिंग रॉड तुटला. त्यामुळे चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले व बस थेट पुलाचा कठडा तोडून खाली कोसळली.
लातूर आगारातून मंगळवारी सकाळी एसटी पुणे-वल्लभनगरसाठी निघाली होती. ही बस मुरुडजवळ बोरगाव काळे येथे आली असताना अचानक बसचा स्टेअरिंग रॉड तुटला. त्यामुळे पुलावरच चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले. पुलाचा कठडा तोडून बल खाली कोसळली. बसची समोरील बाजू मातीच्या ढिगार्‍यावर आदळली. यामुळे आतील प्रवाशांना चांगलाच हादरा बसला. चालकाच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. बसमधील 42 प्रवासी जखमी झाले. यातील 14 जण गंभीर जखमी असल्याची माहिती आहे. अपघात होताच बोरगाव काळे शिवारातील शेतकर्‍यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी एसटीत अडकलेल्या प्रवाशांना बस बाहेर काढले. या शेतकर्‍यांनी तात्काळ 108 क्रमांकाच्या रुग्णवाहिकेला संपर्क साधला. त्यानंतर रुग्णावहिकेतून जखमींना उपचारासाठी मुरुड ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. तेथे प्राथमिक उपचार करून 14 जणांना पुढील उपचारासाठी लातूरच्या शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आले आहे. अद्याप या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, प्रवासी मोठ्या संख्येने जखमी झाले आहेत. तसेच, बसचेही मोठे नुकसान झाले आहे.

COMMENTS