Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

राज्यात थंडीची लाट ; पुणे,अहिल्यानगर गारठले

पुणे : राज्यात थंडीची लाट असून, गेल्या काही दिवसांपासून अहिल्यानगरमध्ये महाबळेश्‍वरपेक्षाही कमी तापमानाची नोंद करण्यात आली आहे. अहिल्यानगरमध्ये 5

राजकीय वादळाचा अर्थ!
रेल विकास निगम लिमिटेडला नवरत्न दर्जा
रोज मासे खात असल्यामुळेच ऐश्‍वर्याचे डोळे सुंदर

पुणे : राज्यात थंडीची लाट असून, गेल्या काही दिवसांपासून अहिल्यानगरमध्ये महाबळेश्‍वरपेक्षाही कमी तापमानाची नोंद करण्यात आली आहे. अहिल्यानगरमध्ये 5.6 एवढ्या कमी तापमानाची नोंद करण्यात आली आहे. उत्तेतील थंडीमुळे राज्यात काही दिवस थंडीची लाट कायम राहण्याची शक्यता आहे.
राज्यातील बहुतांश जिल्ह्यातील तापमान 10 अंशांच्या खाली आले आहे. पुण्यात 8 अंश डिग्री सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तर अहिल्यानगरमध्ये 5.6 एवढ्या कमी तापमानाची नोंद झाली. नाशिकमध्ये देखील पारा हा 8 अंशांवर आला आहे. पुढील काही दिवस नाशिक, पुणे, विदर्भ, मराठवाडा या सर्व भागांमध्ये थंडीचा जोर वाढणार आहे. उत्तर भारतात तर मोठ्या प्रमाणात थंडीची लाट आली आहे.

COMMENTS