बिबट्याने घातली मोटारसायकलवर झडप ; खाली पडून दोनजण जखमी

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

बिबट्याने घातली मोटारसायकलवर झडप ; खाली पडून दोनजण जखमी

देवळाली प्रवरा/प्रतिनिधी-राहुरी तालुक्यातील करजगाव येथे मोटारसायकलवर चाललेल्या दोन तरुणांवर बिबट्याने झडप घातली. अचानक झालेल्या या हल्ल्याने ते दोघेह

पत्रकार संजय वाघ यांच्या वरील गुन्ह्याचा तपास सी. आय .डी. कडे द्यावा
विस्ताराधिकारी उज्वला गायकवाड यांची पुणे विभागात नियुक्ती
करंजी ग्रामपंचायतीच्या वतीने दिव्यांगांना किराणा वाटप

देवळाली प्रवरा/प्रतिनिधी-राहुरी तालुक्यातील करजगाव येथे मोटारसायकलवर चाललेल्या दोन तरुणांवर बिबट्याने झडप घातली. अचानक झालेल्या या हल्ल्याने ते दोघेही मोटारसायकलवरून खाली पडून जखमी झाले. त्यांनी प्रसंगावधान राखून आरडाओरड केल्याने बिबट्याने धूम ठोकली.
राहुरी तालुक्यातील नदीकाठावरील गावांमध्ये बिबट्यांचे हल्ले मोठया प्रमाणात वाढले आहेत. पाळीव व वन्य प्राण्यांना भक्ष्य करणारे बिबटे आता मानवजातीवर दिवसाढवळ्या हल्ले करत आहे. अशीच घटना करजगाव-बोधेगाव रस्त्यावर घडली. शनिवारी रात्री करजगाव येथील सोमनाथ कोतकर व त्याचा मित्र अमोल लोंढे हे दोघे श्रीरामपूर येथून घरी जात असताना बिबट्याने त्यांच्या दुचाकीवर झडप घातली. बिबट्याच्या हल्ल्यात दोघे जखमी झाले आहेत. श्रीरामपूर येथून मुलीची औषधे घेवून घरी जात असताना करजगाव-बोधेगाव रस्त्यावर अंधारात त्यांच्या मोटारसायकलवर अचानक बिबट्याने झडप मारली. हे दोन्ही तरुण मोटारसायकलसह खाली पडले. त्यांनी प्रसंगवधान राखीत जोरजोराने आरडाओरडा करून गाडीचा हॉर्न वाजवल्याने बिबट्याने शेजारील उसाच्या शेतात धूम ठोकली. त्यामुळे काळ आला होता, पण वेळ आली नव्हती म्हणत जखमी सोमनाथ कोतकर या तरुणाने घर गाठले. कोतकर यांच्या हात व पायावर गंभीर जखमा झाल्या असून श्रीरामपूर येथील खासगी दवाखान्यात तो उपचार घेत आहे. दरम्यान, वनविभागाने या भागात पिंजरा लावून बिबट्याला जेरबंद करावे, अशी मागणी माजी पंचायत समिती सभापती वेणूनाथ कोतकर, सरपंच शनिफ पठाण, माजी सरपंच बाळासाहेब आरंगळे, उपसरपंच गणेश कोतकर, तंटामुक्तीचे अध्यक्ष दिगंबर कोतकर, महेश कोतकर, नवनाथ कोतकर, योगेश आरंगळे, त्रिंबक कोतकर आदींनी केली आहे.

आवश्यक सहकार्य करू
प्रवरा नदी काठच्या भागातील करजगाव व अन्य गावात बिबट्यांचे हल्ले वाढले आहेत. ग्रामस्थांनी कुटुंबासह पशुधनाची काळजी घ्यावी. विशेषतः लहान मुलांना एकटे सोडू नका, वन विभागाकडे या भागात पिंजरा लावण्याची मागणी केली आहे. ग्रामपंचायतीमार्फत वन विभागास सर्व सहकार्य केले जाईल, असे करजगावचे सरपंच पठाण यांनी सांगितले.

COMMENTS