Homeताज्या बातम्यादेश

दिल्ली शहरात सीएनजीचे दर पुन्हा वधारले

नवी दिल्ली: देशाची राजधानी असलेल्या दिल्ली शहरात सीएनजीचे दर पुन्हा एकदा वधारले आहेत. सीएनजीच्या दरात 95 पैशांची वाढ झाली आहे. राजधानीत शनिवारी

शेडगेवाडी-मुंबई सेंट्रल एसटी बस सेवा सुरु; शिराळा तालुका प्रवासी संघाच्या पाठपुराव्यास यश
पुण्याला 20.90 टीएमसी पाणी देण्याची मागणी
अभिनेत्री माधुरी दीक्षितला मातृशोक

नवी दिल्ली: देशाची राजधानी असलेल्या दिल्ली शहरात सीएनजीचे दर पुन्हा एकदा वधारले आहेत. सीएनजीच्या दरात 95 पैशांची वाढ झाली आहे. राजधानीत शनिवारी सकाळी 6 वाजेपासून हे नवे दर लागू झाले असून दिल्लीत सीएनजीचा दर 79.56 रुपये प्रति किलो झाला.

नैसर्गिक वायूच्या दरात विक्रमी वाढ होत आहे. यापूर्वी ऐन दिवाळीच्या तोंडावर सर्वसामान्यांना मोठा धक्का बसला होता. आयजीएलने सीएनजी आणि पीएनजीच्या दरात प्रति किलो 3 रुपयांनी वाढ केली होती. राजधानी दिल्लीत सीएनजीचा दर 75.61 रुपयांवरून 78.61 रुपयांवर पोहोचला आहे. तर नोएडा, ग्रेटर नोएडा आणि गाझियाबादमध्ये हे दर 78.17 रुपयांवरून 81.17 रुपये करण्यात आले आहेत. आता पुन्हा सीएनजीच्या दरात वाढ होताच त्याचा फटका सर्वसामान्यांच्या खिशावर पडू शकतो. यासोबातच ओला-उबेर सारख्या सेवा देखील जास्त शुल्क आकारू शकतात. दुसरीकडे, जे दररोज ऑटोने प्रवास करतात, त्यांनाही खिसा मोकळा करावा लागू शकतो. कारण वाहतूक खर्च वाढणार आहे. यासोबतच सीएनजी दरवाढीमुळे फळे आणि भाजीपाल्याचे दर वाढण्याची शक्यता आहे. यापूर्वी एप्रिलमध्ये दिल्लीत 12 तासांत दोनदा सीएनजी महाग झाला होता. शहरात 4 एप्रिल रोजी सकाळी सीएनजीच्या दरात किलोमागे 2.5 रुपयांची वाढ नोंदवण्यात आली. यापूर्वी 3 एप्रिलच्या रात्री सीएनजीच्या दरात 80 पैशांनी वाढ करण्यात आली होती. दिल्लीत सीएनजीच्या दरात वाढ झाली असली तरी दिल्लीत सध्या नोएडा, गाझियाबाद आणि गुरुग्रामहून कमी दर आहेत. त्याचबरोबर मेरठ, रेवाडी, कानपूर आदी ठिकाणी देखील सीएनजीचे दर दिल्लीपेक्षा जास्त आहेत. तर दुसरीकडे पेट्रोल आणि डिझेलचे दरही जनतेला हैराण करत आहेत. मात्र, आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतीत घसरण सुरूच आहे. इंडियन ऑइल मार्केटिंग कंपन्यांनी शुक्रवारी जारी केलेल्या दरांनुसार दिल्लीत पेट्रोलचा दर 96.76 रुपये आणि डिझेलचा दर 89.66 रुपये होता. गेल्या अनेक दिवसांपासून देशात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही.

COMMENTS