Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

शेडगेवाडी-मुंबई सेंट्रल एसटी बस सेवा सुरु; शिराळा तालुका प्रवासी संघाच्या पाठपुराव्यास यश

शिराळा / प्रतिनिधी : शिराळा तालुक्यातील बहुसंख्य लोक नोकरी-व्यवसायाच्या निमित्ताने मुंबईला स्थलांतरित झाले आहेत. त्यांना गावाला ये-जा करण्यासाठी

इस्लामपूरात वाहतुकीस अडथळा करणारे धोकादायक विजेचे खांब हटवण्यास प्रारंभ
जिल्हाधिकारी कार्यालयासमोर युवकाचा आत्मदहनाचा प्रयत्न
छ. शिवाजी महाराजांच्या गुणांची जपणूक करणे हाच यशाचा शिवमंत्र : प्रा. डॉ. विनोद बाबर

शिराळा / प्रतिनिधी : शिराळा तालुक्यातील बहुसंख्य लोक नोकरी-व्यवसायाच्या निमित्ताने मुंबईला स्थलांतरित झाले आहेत. त्यांना गावाला ये-जा करण्यासाठी शिराळा बसस्थानकातून पूर्वी अनेक बसेस धावायच्या. मात्र, हळूहळू त्या बंद करण्यात आल्या. खाजगी बसेस मनमानी पध्दतीने भाडे आकारणी करत असल्याने शिराळा तालुका प्रवासी संघाने एसटीच्या मुंबई सेवा सुरू करण्याबाबत गेल्या महिन्यापासून सातत्याने पाठपुरावा सुरू ठेवला आहे. त्याला प्रतिसाद देत, शिराळा आगारातून शेडगेवाडी ते मुंबई सेंट्रल ही एसटी नव्या मार्गावरून सुरू करण्यात आली. मंगळवार, दि. 19 रोजी सायंकाळी 6:30 वाजता ही बस शेडगेवाडी येथून मार्गस्थ झाली.
शिराळा तालुक्यातील सार्वजनिक वाहतूक सेवा सुरळीतपणे चालू होण्यासाठी शिराळा तालुका प्रवासी संघ प्रयत्नशील आहे. स्थानिक वाहतुक तसेच, पुणे आणि मुंबईला जाणार्‍या एसटी बसेससाठी संघाच्या माध्यमातून सातत्याने पाठपुरावा करण्यात येत आहे. नवीन मार्गांची आखणी, प्रवाशांमध्ये एसटी बद्दल जनजागृती, नवीन आधुनिक गाड्या आदी बाबींवर संघटीतपणे काम होण्याबाबत प्रवासी संघ आग्रही आहे. या विषयाबाबत एसटी प्रशासन आणि खासदार धैर्यशील माने यांच्याशी पत्रव्यवहार करण्यात आला आहे.
सुरुवातीला शेडगेवाडी ते मुंबई सेंट्रल ही बस मंगळवारपासून सुरू करण्यात येणार आहे. शिराळा तालुक्यातील पश्‍चिम आणि उत्तर भागातील मुंबईकर प्रवाशांची सोय व्हावी या हेतूने ही बस वाकुर्डे मार्गे जाणार आहे. तिचा मार्ग शेडगेवाडी-येळापूर-वाकुर्डे बु।-आंबेवाडी-शिरशी-शिवरवाडी- भैरववाडी- टाकवे- पाचुंब्री फाटा- बांबवडे फाटा- वाटेगांव- शेणे- कासेगांव- कळंबोली- कामोठे- खारगर-बेलापूर- नेरूळ- जुईनगर- सानपाडा- मानखुर्द- चेंबूर मैत्री पार्क- सायन (प्रियदर्शनी)- दादर- डिलाईल रोड- मुंबई सेंट्रल असा आहे. दि.20 ऑक्टोबर रोजी रात्री 8-00 वाजता एसटी मुंबई सेंट्रलहून परत शेडगेवाडीच्या दिशेने निघेल.
शेडगेवाडी – मुंबई सेंट्रल एसटीस प्रवाशांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्यास, अजून इतर मार्गावरून मुंबईसाठी गाड्या सोडण्याचा विचार असल्याचे, आगारप्रमुख विद्या कदम यांनी सांगितले आहे.
मुंबईसाठी निमआराम, स्लीपर सीटर, शिवशाही गाड्या सोडण्याची मागणी प्रवासी संघातर्फे करण्यात आली. शिवाय लगेज ठेवण्यासाठी डिकीची व्यवस्था तसेच, कराड आणि सातारा बसस्थानकात न जाता राष्ट्रीय महामार्गावरील हे थांबे घेऊन बस जलद गतीने मार्गस्थ करण्याची मागणी प्रवाशी संघाने केली आहे.
युवराज पाटील (समन्वयक शिराळा तालुका प्रवासी संघ)

COMMENTS