Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

युत्या खुशाल कराव्या, पण, विचारांचे भान राखून !

     राजकारण हा असा विषय आहे की, सर्वसामान्य माणूस यात क्षणाक्षणाला होणाऱ्या घडामोडींची कल्पनाही करू शकत नाही. आता हेच पहा ना, तीन

तिसर्‍या पर्यायाच्या शोधात !
जनमताचा कौल अनाकलनीय ! 
लोकांच्या प्रश्नांची सोडवणूक कधी ?

     राजकारण हा असा विषय आहे की, सर्वसामान्य माणूस यात क्षणाक्षणाला होणाऱ्या घडामोडींची कल्पनाही करू शकत नाही. आता हेच पहा ना, तीन वर्षांपूर्वी महाराष्ट्रात महाविकास आघाडीच्या माध्यमातून शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काॅंग्रेस या तीन प्रमुख पक्षांचे सरकार होते. यात इतरही काही पक्ष सामिल होते परंतु, त्यातील प्रहार हा बच्चू कडू यांचा पक्ष तेवढा सत्तेत समाविष्ट होता. त्या सरकारला अडीच वर्षे झाले नि शिवसेनेतील बंडखोरी ने सत्तेची कूस बदलली आणि एकनाथ शिंदे -भाजप च्या युतीकडे सत्ता गेली. अर्थात, या सत्तेवर अजूनही न्यायालयाच्या निर्णयाची टांगती तलवार कायम आहे. परंतु, या सरकारमधील घटक पक्षांनी २०२४ च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या दिशेने तयारी सुरू केल्याचे स्पष्ट झाले आहे. यात सर्वात महत्वाची घडामोड काल झाली ती एकनाथ शिंदे यांच्या बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाच्या वतीने. या पक्षाची पिपल्स रिपब्लिकन पार्टी या प्रा. जोगेंद्र कवाडे यांच्या पक्षाबरोबर युती झाली. सत्तेत असलेल्या भारतीय जनता पक्षासोबत केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांचा रिपब्लिकन गट आहे. महाराष्ट्रात प्रत्येक पक्षाला असे वाटते की आपल्या सोबत निळा झेंडा असणारा एक रिपब्लिकन गट असावा. तसा गट येत नसेल तर रूटीन राजकीय पक्ष मुळ रिपब्लिकन पक्षातूनच आणखी एखादी गटाची निर्मिती करतात, अन् नव्याने स्थापन झालेल्या गटाला आपल्या सोबत घेतात. जेव्हा रिपब्लिकन पक्ष तिसऱ्या आघाडीसोबत युती करायला लागले, तेव्हा महाराष्ट्रात काॅंग्रेस सोबत रिपब्लिकन गट असावा या भूमिकेतून टीएम कांबळे गट तत्कालीन मुख्यमंत्री दिवंगत विलासराव देशमुख यांनी निर्माण करण्यात हातभार लावला होता. रिपब्लिकन नेते चंद्रकांत हंडोरे यांना तर काॅंग्रेसने आपल्यातच विलिन करून घेतले होते. अर्थात रिपब्लिकन नेते काॅंग्रेसवासी होण्याची परंपरा पा.ना. राजभोज, भंडारे, रूपवते अशी मोठी परंपरा आहे. दिवंगत रा. सु. गव‌ई तर स्वतंत्र रिपब्लिकन गट ठेऊन काॅंग्रेसच्या माध्यमातून सत्ता पदावर राहीले. नव्वदच्या दशकात काॅंग्रेस सोबत रिपब्लिकन नेत्यांनी केलेल्या युतीतून चार खासदार महाराष्ट्रात निवडून आले होते. त्यात ऍड. प्रकाश आंबेडकर, रामदास आठवले, प्रा. जोगेंद्र कवाडे आणि दिवंगत रा. सु. गव‌ई यांचा समावेश होता. मात्र, युती-आघाडीच्या कचाट्यात सापडलेल्या रिपब्लिकन पक्षाला पक्षबांधणी कधी करताच आली नाही. अर्थात, ऍड. प्रकाश आंबेडकर यांनी आपले स्वतंत्र राजकीय प्रयोग निश्चितपणे केले. परंतु, महाराष्ट्राची सत्ता थेट हातात घेतील, अशी परिस्थिती निर्माण झाली नाही. रिपब्लिकन नेत्यांच्या याच परंपरेत प्रा. जोगेंद्र कवाडे येतात. एक वेळा खासदार आणि राष्ट्रवादी काँग्रेस च्या माध्यमातून एम‌एलसी मिळालेल्या जोगेंद्र कवाडे यांनी सूत्रबद्ध रित्या पक्षबांधणी केल्याचे दिसत नाही. आज त्यांचा रिपब्लिकन गट हा महाराष्ट्रातील शक्तीविहीन गट मानला जातो. एकेकाळी आक्रमक वक्तृत्व आणि हिंदी भाषेवरही प्रभुत्व असल्यामुळे त्यांना देशभर ऐकणारा श्रोता होता. पण, पक्षबांधणी चे गांभीर्याच्या दृष्टीने त्यांनी पक्ष वाढवलेला दिसत नाही. पक्षाची स्वतंत्र ताकद उभी नसेल तर कोणत्याही पक्षासोबत युती करण्यात धन्यता मानण्याइतपत या नेत्याला येऊन ठेपावे लागले आहे. कधीकाळी हाजी मस्तान सारख्या अतिशय वादग्रस्त व्यक्तीमत्वासोबत दलित, अल्पसंख्याक सुरक्षा महासंघ चालवणारे आक्रमक कवाडे गेल्या काही दिवसांपासून अनेक नेत्यांच्या भेटीगाठी घेत होते. परंतु, त्यांची पक्षीय ताकद पहाता काही पक्षांकडून टाळाटाळ केली गेल्याचे आतल्या गोटात चर्चा असल्याचे बोलले जाते. कोणी कोणत्या पक्षा बरोबर युती किंवा आघाडी करावी, हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. परंतु, आंबेडकरी विचारांचे राजकारण संपुष्टात येईल, इतपत युत्या आघाड्यांचे स्वरूप असू नये, एवढेच!

COMMENTS