Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्‍वभूमिवर प्रशासकीय इमारतीच्या परिसराची अधिकारी कर्मचार्‍यांकडून स्वच्छता

सातारा / प्रतिनिधी : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्ताने तसेच स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्‍वभूमीवर प्रशासकीय इमारतीमध्ये अधिकारी-कर्मचार्‍य

आरक्षण हा आपल्या जिव्हाळ्याचा प्रश्‍न : शशिकांत तरंगे
राजकीय पक्षांच्या विद्यार्थी संघटना विद्यार्थी दिनी कोमात
बोगस ‘टीईटी’ केलेल्या शिक्षकांच्या नोकर्‍या जाणार

सातारा / प्रतिनिधी : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्ताने तसेच स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्‍वभूमीवर प्रशासकीय इमारतीमध्ये अधिकारी-कर्मचार्‍यांनी पहिल्यांदाच स्वच्छता मोहीम राबवल्याच्या प्रकारामुळे जिल्ह्यातील शासकिय कार्यालयातील कर्मचार्‍यांनी धसका घेतल्याची चचार्र् सुरु झाली आहे. या इमारतीच्या प्रत्येक कार्यालयात किमान दोन ते तीन शिपाई कार्यरत आहेत. मात्र, आत्ताचे शिपाई या पदावर काम करणारे लोक कार्यालयाच्या परिसराची स्वच्छता म्हटले की नाक मुरडत असतात.
यंदाच्या वर्षी सातारा शहर परिसरातील सर्व शासकिय कार्यालयांचा परिसर हिरवा गार झाला आहेे. प्रशासकिय इमारतीचा ताबा सार्वजनिक बांधकाम विभागाकडे आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग मलाई मिळत असलेली सर्व कामे करते. मात्र, कार्यालयाच्या परिसराची स्वच्छता मात्र कधीही करत नाही. गरजेच्या वेळी ते नेहमीच जिल्हाधिकारी यांच्या नावाखाली सातारा नगरपालिकेवर ही जबाबदारी टाकून देत होते. नगरपालिकेचा या इमारतीशी काडीमात्र संबंध नसतानाही झेंडा वंदनाच्या कार्यक्रमासाठी स्वच्छता करून देत असत. हे स्वच्छतेचे काम करण्यासाठी नेहमीच सातारा नगरपरिषदेच्या कर्मचार्‍यांना कौटुंबिक न्यायालयाच्या नावावर दम दिला जात होता. यंदा मात्र हा दम सातारा पालिकेच्या कर्मचार्‍यांनी धुडकावून लावला असल्याचा प्रत्यय आला आहे. त्यामुळे अवध्या दोन दिवसावर स्वातंत्र्य दिन आलेला आहे. नगरपरिषदेच्या कर्मचार्‍यांनी स्वच्छता न केल्यास प्रशासकिय इमारतीच्या आवारात वृक्षारोपन करताना फोटो शेशन गुडघाभर गवतात करायचे काय? असा सवाल उपस्थित होणार होता. याच इमारतीमध्ये कृषिविभागाची दोन कार्यालये, वन विभागाचे एक कार्यालय, सहकार विभागाचे कार्यालय, पोलीस दलाची दोन कार्यालये, समाज कल्याण विभागाचे कौशल्य विकास विभागाचे कार्यालय, प्रदुषण मंडळाचे कार्यालय याबरोबरच कौटुंबिक न्यायालय आदी कार्यालये आहेत. या कार्यालयात काम करणार्‍या कर्मचार्‍यांची संख्या सुमारे 300 असेल. शेकडो लोक या कार्यालयामध्ये दररोज येत असतात. तरीही परिसराची नियमित स्वच्छता केली जात नाही.
या स्वच्छता मोहिमेत जिल्हा उपनिबंधक मनोहर माळी, कृषी विभागाच्या लेखाधिकारी सीतल करंजेकर, सहाय्यक निबंधक जनार्दन शिंदे, सहाय्यक निबंधक उमेश उंबरदंड यांच्यासह इमारतीमधील कृषी विभाग, सहकार विभाग, कौटूंबिक न्यायालय, आत्मा कार्यालय, महिला बालविकास अधिकारी कार्यालय, जिल्हा माहिती कार्यालय आदी कार्यालयातील कर्मचार्‍यांनी स्वयंप्रेरणेने इमारतीच्या परिसराची पहिल्यांदा स्वच्छता केली.

COMMENTS