Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

नागरिकांनी रेशन कार्डसाठी ऑनलाईन अर्ज करावेत

तहसीलदार भोसले ः सर्वानाच मिळणार ई-शिधापत्रिका

कोपरगाव शहर प्रतिनिधी ः कोपरगाव तालुक्यातील सर्व नागरिकांना नवीन शिधापत्रिका काढण्यासाठी तसेच नाव समाविष्ट करणे,नावे कमी करणे यासाठी पुरवठा विभाग

मालट्रकची कारला धडक तिघे किरकोळ जखमी कारचे नुकसान 
राहुरी तालुक्याला अवकाळी पावसाने झोडपले
एक लाख लोकांनी सूर्यनमस्कारातून केली राष्ट्रवंदना

कोपरगाव शहर प्रतिनिधी ः कोपरगाव तालुक्यातील सर्व नागरिकांना नवीन शिधापत्रिका काढण्यासाठी तसेच नाव समाविष्ट करणे,नावे कमी करणे यासाठी पुरवठा विभागाकडून ऑनलाईन सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असल्याची माहिती तहसीलदार संदीपकुमार भोसले यांनी दिली आहे.
     नवीन शिधापत्रिका तसेच रेशनकार्ड संदर्भातील कोणत्याही कामासाठी आता  नागरिकांना प्रत्यक्ष तहसील कार्यालयात येण्याची गरज राहिलेली नाही.पुरवठा विभागाकडून ई-शिधापत्रिका देण्यात येणार आहेत.नागरिकांनी गुगल या संकेत स्थळावर जावून हीींिीं://ीलाी.ारहरषेेव.र्सेीं.ळप या संकेत स्थळाला भेट द्यावी व  पब्लिक लॉगिन यावर क्लिक करून आपले रजिस्ट्रेशन करून घ्यावे.याबाबत सर्व सेतू चालकांना माहिती देण्यात आली असून नागरिक आपल्या कामासाठी ई.सेवा केंद्र (सेतू)यांच्याशी संपर्क करू शकतात.रेशनकार्ड संदर्भात पूर्ण माहिती  ऑनलाईन भरल्यानंतर तसेच संबधित पुरावे अपलोड केल्यानंतर तहसील कार्यालयाकडून  मंजुरी देण्यात येणार आहे.त्यानंतर डिजिटल सहीचे  ई.रेशन कार्ड मिळणार आहे. नागरिकांनी तहसील कार्यालयात गर्दी न करता रेशन कार्ड संदर्भातील कामासाठी ऑनलाईन अर्ज करावे असे आवाहन तहसीलदार संदीप कुमार भोसले यांनी केले आहे.

COMMENTS