बोल्हेगाव, नागपूर परिसरात रोडरोमिओंचा सुळसुळाट… नागरिक आक्रमक…

Homeताज्या बातम्याअहमदनगर

बोल्हेगाव, नागपूर परिसरात रोडरोमिओंचा सुळसुळाट… नागरिक आक्रमक…

अहमदनगर प्रतिनिधी -प्रभाग क्रमांक ७ मधील बोल्हेगाव,नागपूर परिसरात चोरट्यांचा सुळसुळाट निर्माण झाला आहे.भर दिवसा चोऱ्यांचे प्रमाण या परिसरात वाढल्

एकतर्फी प्रेमातून मुलीला ठेवले डांबून ; नगरच्या एकाविरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल
शिक्षक मतदारसंघातील मतदानाची टक्केवारी घसरणार : सचिन झगडे
रोहमारे महाविद्यालयातील विद्यार्थीनीस पारितोषिक प्रदान

अहमदनगर प्रतिनिधी –
प्रभाग क्रमांक ७ मधील बोल्हेगाव,नागपूर परिसरात चोरट्यांचा सुळसुळाट निर्माण झाला आहे.भर दिवसा चोऱ्यांचे प्रमाण या परिसरात वाढल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. रस्त्याने जाणाऱ्या-येणाऱ्या महिलां व युवतीची छेडछाड रोडरोमिओंन कडून मोठ्या प्रमाणात वाढले आहे तसेच महिलांच्या गळ्यातील दागिने ओरबडणे गाड्यांच्या काचा फोडणे, मोबाईल चोरी,वाहन चोरी,बॅटरी चोरी, भरदिवसा घरामध्ये घुसून शस्त्राचा धाक दाखवून चोऱ्या करणे असे विविध चोऱ्यांचे प्रकार सदर परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात सुरू आहे.

त्यामुळे परिसरातील नागरिक भयभीत व त्रस्त झाले आहे.साईराज नगर या भागात रात्रीचे वेळी घराच्या बाहेर ठेवलेल्या वस्तूंची चोरी देखील चोरटे मोठ्या प्रमाणात करत आहे. त्यामुळे सदर परिसरातील नागरिक देखील त्रस्त झाले आहे तोफखाना पोलिस ठाण्याच्या हद्दीत सदरचा हा भाग येतो परंतु तोफखाना पोलीस या ठिकाणी गस्त घालायला फिरकत नाही कुठल्याही प्रकारची रात्रीच्या वेळी या ठिकाणी पोलिसांकडून गस्त घातली जात नाही त्यामुळे चोरट्यांना मोकळे रान निर्माण झाले आहे.

चोरट्यांन वर तोफखाना पोलिसांचा धाक नाही तरी तोफखाना पोलिसांनी सदर बाब गांभीर्याने लक्षात घेऊन नागरिकांच्या संरक्षणासाठी पोलीस प्रशासनाने तत्परता दाखवावी अशा मागणीचे निवेदन तोफखाना पोलीस ठाण्यांमध्ये नगरसेवक कुमारसिंह वाकळे व प्रभागातील नागरिकांनी पोलिस ठाण्यातील पोलिस उपनिरीक्षक समाधान सोळंकी यांना दिले आहे

तरी लवकरात लवकर सदर चोरट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी दिलेल्या निवेदनाद्वारे करण्यात आली यावेळी गोरक्ष खाडे,मदन दिवटे,संदीप गहिले,उत्तम अडसूळ,शैलेश यादव,रवींद्र साठे,बाळासाहेब गोरंडे,रमेश वाकळे,अविनाश काळे,दिलीप रावस,रमेश शेळके,सनी कदम,प्रमोद गायकवाड,वैभव शेवाळे,विनोद गुंजाळ,विकी बोरा,विकास आंधळे,वैभव मुथा,अशोक गवांदे,नवनाथ कोलते,संतोष वाटमोडे,भाऊसाहेब काळे,आदिनाथ मस्के,समाधान मोरे,प्रदीप बर्वे,देविदास कुमावत,संदीप कापडे,पंकज लोखंडे, शरद महापूरे,जीवन पगार,निवृत्ती उंडे आदी उपस्थित होते.

COMMENTS