Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

रस्ता खुला करण्यासाठी तहसिलसमोर शेतकर्‍यांचे उपोषण

पाथर्डी : मोहोज खुर्द येथील एका शेतकर्‍याने अडवलेला रस्ता खुला करून संबंधितावर गुन्हा दाखल करावा यासाठी गावातील शेतकर्‍यांनी पाथर्डी तहसील कार्या

राजकीय पक्षांची चिन्हेही गोठवली जावीत…राळेगण सिद्धीच्या बैठकीत ठराव
विकास थांबवणारा तुमचा लोकप्रतिनिधी होऊ शकत नाही ः डॉ. सुजय विखे
अहमदनगर यतीमखाना संस्थेतील माजी विद्यार्थी 30 वर्षानंतर आले एकत्र

पाथर्डी : मोहोज खुर्द येथील एका शेतकर्‍याने अडवलेला रस्ता खुला करून संबंधितावर गुन्हा दाखल करावा यासाठी गावातील शेतकर्‍यांनी पाथर्डी तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे.गेल्या एक-दीड महिन्यापूर्वी एका शेतकर्‍याने वैयक्तिक वादातून गेल्या पन्नास वर्षापासून शेतामध्ये जाण्याचा रस्ता आहे तो रस्ता बंद करून लोकांची अडवणूक करण्यात आली आहे.
दरम्यान यावेळी कायदेशीर कारवाई करून रस्ता खुला केला जाईल असे आश्‍वासन तहसीलदार उद्धव नाईक यांनी दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शेतामध्ये जाण्यासाठी पन्नास वर्षांपासून गट नं 568 च्या पश्‍चिमेच्या बाजूला गाडी रस्ता आहे. परंतु भाऊसाहेब दामोधर वांढेकर यांनी 1991 साली खरेदी केलेली आहे. मात्र याच गटाच्या बाजूने जाणारा पन्नास वर्षापासूनचा रस्ता भाऊसाहेब वांढेकर यांनी बेकायदेशीररित्या रस्ता बंद केला आहे. रस्ता अडविल्याबाबत फेब्रुवारी महिन्यात निवेदन दिलेले आहे. तहसीलदार यांनी मोहोज खुर्द येथील कामगार तलाठी व मंडळ अधिकारी यांना स्थळ पाहणी करण्याचे आदेश दिले होते. स्थळ पाहणी करण्यात आली. परंतु रस्ता आजपर्यंत चालू केलेला नाही. या भागात 60 एकर हून अधिक शेतीचे क्षेत्र आहेत याच रस्त्यावरून सर्व शेतकरी आपल्या शेतीकडे ये जा करतात, रस्ता अडून धरल्यामुळे उसाची तोडणी करून त्यांची वाहतूक नदीमार्गे  करावी लागली. शेती करताना व शेतीमाल नेताना मोठे हाल सहन करावे लागत आहे त्यामुळे येथील असंख्य शेतकर्‍याचे होणारे हाल त्वरित थांबून हा रस्ता तातडीने खुला करावा अन्यथा यापेक्षाही तीव्र आंदोलन केले जाईल असा इशारा उपोषण करते शेतकर्‍यांनी दिला आहे. निवेदनावर लताबाई वांढेकर, एकनाथ वांढेकर, नारायण वांढेकर संतोष वांढेकर, मुरलीधर वांढेकर, मीना वांढेकर, रामनाथ वांढेकर, एकनाथ वांढेकर, शशिकांत वांढेकर आदींच्या स्वाक्षर्‍या आहेत.

COMMENTS