Homeताज्या बातम्यादेश

देशात आढळला कोरोनाच्या नव्या व्हेरियंटचा रुग्ण

नवी दिल्ली ः देशभरात नव्या वर्षाचे जल्लोषात स्वागत करण्याची तयारी सुरू असतांनाच, शनिवारी भारतात कोरानोच्या नव्या व्हेरियंटचा रुग्ण आढळल्यामुळे खळ

बिग बॉसच्या घरात वाजणार कॅप्टनसीची ‘टिकटिक’
गोव्याहून मुंबईकडे जाणाऱ्या खासगी ट्रॅव्हल्सचा अपघात
Video : किती दिवस डांबून ठेवणार, घोटाळे बाहेर काढणारच

नवी दिल्ली ः देशभरात नव्या वर्षाचे जल्लोषात स्वागत करण्याची तयारी सुरू असतांनाच, शनिवारी भारतात कोरानोच्या नव्या व्हेरियंटचा रुग्ण आढळल्यामुळे खळबळ उडाली आहे. एक्सबीबी.1.5 या व्हेरिअंटचा रुग्ण गुजरातमध्ये आढळून आल्यामुळे खळबळ उडाली आहे. या व्हेरियंटने अमेरिकेत कोरोनाची लाट आणण्यास सुरुवात केली आहे. असे असताना चीनच्या व्हेरिअंटनंतर भारतात अमेरिकेतील दुसरा सुपर व्हेरिअंट सापडला आहे.

कोरोना व्हायरसचा एक्सबीबी 1.5 चा एक नवा व्हेरियंट अमेरिकेत सापडला आहे. जो अन्य व्हायरच्या व्हेरियंटच्या तुलनेत खूप धोकादायक आहे. चीनी वंशाचे अमेरिकन आरोग्य तज्ज्ञ एरिक फीगेल डिंग यांचे म्हणणे आहे की, हा व्हेरिएंट पूर्वीच्या व्हेरिअंटपेक्षा 120 पट वेगाने संसर्ग पसरवतो. पूर्वीच्या सर्व व्हेरिएंटपेक्षा मानवी रोगप्रतिकारक शक्तीला चकमा देण्यात तो अधिक पटाईत आहे. एक्सबीबी 1.5 हा व्हेरिएंट हा कोरोनाचा सुपर प्रकार असल्याने डिंग यांचे मत आहे. त्यामुळे कोरोनाशी संबंधित रुग्णालयात दाखल होणार्‍या रुग्णांचे प्रमाण सातत्याने वाढत आहे. आरोग्यतज्ज्ञ डिंग यांनी म्हटले की, येथील एका शास्त्रज्ञाने न्यूयॉर्कमध्ये पसरलेल्या या व्हेरिएंटचा अभ्यास केला आहे. त्यांनी सलग 17 ट्विट करीत आरोप केला की, चीनप्रमाणे अमेरिकाही कोरोनाच्या नवीन व्हेरिएंटचा डेटा लपवत आहे. तर या नव्या व्हेरिएंटचा रुग्ण आता भारतातील गुजरातमध्येही आढळून आला आहे.

महाराष्ट्रातील सर्व्हेलान्स अधिकारी डॉ. प्रदीप आवटे यासंदर्भात बोलतांना म्हणाले की, आम्ही विषाणूच्या जेनेटिक फूटप्रिंट्सवर लक्ष ठेवून आहोत. राज्यात 100 टक्के जिनोमिक सिक्वेन्सिंग केले जात आहे. आंतरराष्ट्रीय प्रवाशांचेदेखील थर्मल स्क्रीनिंग आणि 2 टक्के रँडम सॅम्पलिंग घेत आहोत. त्यानंतर पॉझिटिव्ह नमुने जिनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठवले जात आहेत.

COMMENTS