अहमदनगर : कापुरवाडी येथील हरिभाऊ किसन धाडगे व अशोक धर्माजी कराळे मोटार सायकलवर चारीधाम यात्रेसाठी रवाना झाले. या प्रवासा दरम्यान दररोज 250 ते 300 कि
अहमदनगर : कापुरवाडी येथील हरिभाऊ किसन धाडगे व अशोक धर्माजी कराळे मोटार सायकलवर चारीधाम यात्रेसाठी रवाना झाले. या प्रवासा दरम्यान दररोज 250 ते 300 कि.मी. प्रवास करणार आहेत. 45 दिवसात ओंकारेश्वर (मध्यप्रदेश), आयोध्या (उत्तर प्रदेश), अमरनाथ (काश्मिर), इलाहाबाद आदि ठिकाणच्या चारधामच्या यात्रा करणार आहेत. त्याचबरोबर या प्रवासादरम्यान येणार्या प्रसिद्ध देवस्थांनाही भेट देणार आहेत. हरिभाऊ धाडगे हे सार्वजनिक बांधकाम विभागात कार्यरत असून, यापूर्वीही त्यांनी मोटारसायलवर बालाजी, कन्याकुमारी, रामेश्वर, मदुराई, गंगासागर आदि ठिकाणच्या देवस्थानांना भेटी दिल्या आहेत. पूर्वी चारधामची यात्रा ही पायी केली जात असायची, आता उपलब्ध साधनांनुसार अनेकजण देवदर्शनास जाता. देवांवर पुर्ण विश्वास व श्रद्धा असल्याने हे कार्य माझ्या हातून घडत असल्याची प्रतिक्रिया हरिभाऊ धाडगे यांनी व्यक्त केली.
COMMENTS