बाळच्या जीवाला नगर व पारनेरला धोका…नाशिकला ठेवा ; वकिलाने केली न्यायालयाकडे मागणी, निर्णयाची प्रतीक्षा

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

बाळच्या जीवाला नगर व पारनेरला धोका…नाशिकला ठेवा ; वकिलाने केली न्यायालयाकडे मागणी, निर्णयाची प्रतीक्षा

रेखा जरे हत्याकांडातील मुख्य आरोपी व दैनिक सकाळचा कार्यकारी संपादक बाळ ज.

पार्वताबाई बाबुराव आरोटे यांचे निधन
दारणा पाणलोटातील पावसाने गोदावरी खोर्‍यात समाधान
आमदार लंकेच्या उपोषणाच्या समर्थनार्थ पाथर्डीत रास्ता रोको

अहमदनगर/प्रतिनिधी- रेखा जरे हत्याकांडातील मुख्य आरोपी व दैनिक सकाळचा कार्यकारी संपादक बाळ ज. बोठे याच्या जीवाला नगर व पारनेरला धोका असून, त्याला नाशिकला ठेवण्याची मागणी बोठेेच्यावतीने त्याचे वकील अ‍ॅड. संकेत ठाणगे यांनी न्यायालयात अर्जाद्वारे केली आहे. 

या अर्जावर न्यायालयाचा निर्णय प्रतीक्षेत आहे. दरम्यान, बोठेला जरे हत्याकांडात न्यायालयीन कोठडी मिळाली असून, कोतवाली पोलिसांनी त्याला आता त्यांच्याकडे दाखल असलेल्या विनयभंगाच्या गुन्ह्यात वर्ग केले आहे. यात गुन्ह्यात त्याला आता शुक्रवारी नगरच्या न्यायालयात हजर केले जाणार आहे. यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे यांच्या हत्येचा मुख्य सुत्रधार अ‍ॅड. डॉ. बाळ उर्फ बाळासाहेब जगन्नाथ बोठे पाटील याची जरे खून प्रकरणात गुरुवारी न्यायालयीन कोठडीत रवानगी झाल्यानंतर त्याचे वकील अ‍ॅड. ठाणगे यांनी न्यायालयात अर्ज केला व बोठेला पारनेर किंवा नगर येथे न ठेवता नाशिक येथे ठेवण्याची मागणी त्यांनी न्यायाधीश उमा बोर्‍हाडे यांच्याकडे अर्जाद्वारे केली.

म्हणून त्याच्या जीवाला धोका

बोठे याचे वकील संकेत ठाणगे यांनी न्यायालयाकडे अर्ज दाखल करून पारनेर व नगर येथे बोठे याच्या जीवितास धोका असल्याचे नमूद केले आहे. बोठे याने पत्रकारीता करताना ज्यांच्या विरोधात बातम्या छापल्या, अशा आरोपींकडून त्याच्या जीवितास धोका असल्याचे अर्जाद्वारे सांगण्यात आले आहे. बोठे याच्या या अर्जावर न्यायालय काय निर्णय देणार याची उत्सुकता आहे. दरम्यान, बोठे याचा इन्कमटॅक्स रिटर्न दाखल करायचा असल्याने बोठेच्या विविध कागदपत्रांवर सह्या घेण्याची परवानगीही मागण्यात आली. ती देण्यात आल्यानंतर बोठे याच्या सह्या घेण्यात आल्या.

त्याला आणले नगरला

बोठे यास नगरच्या पोलिसांनी ताब्यात घेऊन त्याला नगरच्या कोतवाली पोलिस ठाण्यात रवाना करण्यात आले. त्याच्या पोलिस कोठडीची मुदत संपल्यानंतर त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली. त्यानंतर कोतवाली पोलिस ठाण्यातील विनयभंगाच्या गुन्हयात कोतवालीचे पोलिस निरीक्षक राकेश मानगांवकर यांनी बोठेला ताब्यात घेतले. तेथे इतर गुन्हे देखील बोठे याच्याविरुद्ध दाखल आहेत. त्या गुन्हयांमध्ये बोठे यास न्यायालयीन कोठडी मिळाल्यानंतर त्यास पुन्हा पारनेरच्या न्यायालयीन कोठडीत ठेवण्यात येईल.

COMMENTS