Homeताज्या बातम्याशहरं

चंद्रिका आयुर्वेदिक साबणाचे आपल्‍या देशाचा ग्‍लो हा संदेश देणाऱ्या नव्या टीव्ही जाहिरातीद्वारे महाराष्ट्राच्या बाजारपेठेत पुनरागमन

नाशिक प्रतिनिधी - भारतातील अतिशय झपाट्याने विकसित होत असलेल्‍या एफएमसीजी विप्रो कन्झ्युमर केअर अँड लायटिंग कंपनीला आपला पारंपरिक ब्रॅण्ड चंद्

होळीचे दहन सोमवारी की मंगळवारी ?
नकली बंदुकीच्या धाकावर ज्वेलर्स लुटण्याचा प्रयत्न;घटना CCTVमध्ये कैदI LOKNews24
’टेरर फंडिंग’चा धोका दहशतवादाहून मोठा – गृहमंत्री शहा

नाशिक प्रतिनिधी – भारतातील अतिशय झपाट्याने विकसित होत असलेल्‍या एफएमसीजी विप्रो कन्झ्युमर केअर अँड लायटिंग कंपनीला आपला पारंपरिक ब्रॅण्ड चंद्रिका आयुर्वेदिक साबण महाराष्ट्राच्या बाजारपेठेत पुनरागमन होत असल्याची घोषणा करतांना अत्यंत आनंद होत आहे. या जाहिरातीतून साबणाच्या निर्मितीमध्ये पिढ्यानुपिढ्यांचे ज्ञान, त्‍वचेच्‍या देखभालीबाबतच्‍या काळाच्या ओघात टिकून राहिलेल्या आपल्या परंपरा त्‍वचेचे आरोग्‍य व चमक वाढविण्‍यासाठी कशाप्रकारे मदत करतात हे दाखवण्‍यात आले आहे. या नवीन टीव्ही जाहिरातीद्वारे साबणाच्या ८० वर्षांहून जुन्या परंपरेवर भर देत ग्राहकांच्या हाती “आपल्‍या देशाचा ग्लो” देण्याचा ब्रॅण्डचा प्रयत्न आहे.

चंद्रिका आयुर्वेदिक साबणाचा नवा पॅक खास महाराष्ट्रातील ग्राहकांच्या पसंतीचा विचार करून नव्याने तयार करण्यात आला आहे, ज्यामुळे या ब्रॅण्डचे बाजारातील नव्या ग्राहकांशी देखील नाते जोडले जाणार आहे. साबणाचा नवा आकार आणि नवेकोरे पॅकेजिंग यामुळे तो अधिकच आकर्षक बनला आहे. काळाच्या कसोटीवर सिध्‍द झालेल्या आयुर्वेदिक घटकांना एकत्र आणत विप्रोने नव्याने तयार केलेला चंद्रिका साबण महाराष्ट्रभरात अधिक मोठ्या ग्राहकवर्गापर्यंत पोहोचेल आणि या प्रांतामध्ये आपले स्थान अधिक भक्कम करेल. 

आयुर्वेदातील त्वचेच्या देखभालीसाठीच्या पद्धती, नैसर्गिक घटकांचे महत्त्व आणि त्यामुळे त्वचेच्या स्वच्छतेसाठी, तिच्या पोषणासाठी व संरक्षणासाठी तसेच त्वचेच्या अनेक समस्या दूर करण्यासाठी वनौषधी, तेल आणि इतर नैसर्गिक पदार्थांच्‍या वापरावर महत्व दिले जाते. चंद्रिका आयुर्वेदिक साबण हा असा एकमेव साबण आहे, ज्याच्यामध्ये आठ दशकांपासून विश्वासार्ह मानल्या गेलेल्या आणि आजमावल्या गेलेल्या आगळ्यावेगळ्या आयुर्वेदिक सिध्‍दतेचा वापर करण्यात आला आहे. चंद्रिका आयुर्वेदिक साबणाच्या नव्या फॉर्म्युलेशनमध्ये त्वचेचा पोत सुधारणाऱ्या वेचक आयुर्वेदिक घटकांचा वापर करण्यात आला आहे. हे घटक परस्पर मेळ साधतात आणि उल्लेखनीय परिणाम साध्य करतात. आणि या घटकांचा त्वचेला अधिकाधिक फायदा मिळावा यासाठी ते अत्यंत कुशलतेने खोबरेल तेलामध्ये भिजविले जातात, जेणेकरून त्यांचा अर्क प्राप्त व्हावा आणि त्यांची परिणामकारकता वाढावी. 

आपले उत्पादन महाराष्ट्राच्या बाजारपेठेत नव्याने दाखल करण्याविषयी श्री. नीरज खत्री, चीफ एग्जीक्यूटिव, कन्‍झ्युमर केअर बिझनेस फॉर इंडिया आणि साऊथ एशिया म्हणाले, “चंद्रिका आयुर्वेदिक साबण गेल्‍या ८ दशकांपासून आमच्‍या लाखो निष्‍ठावान ग्राहकांकरिता चमकदार त्‍वचेसाठी विश्‍वसनीय ब्रॅण्‍ड म्‍हणून काळाच्‍या कसोटीवर खरा ठरला आहे. भारतभरातील ग्राहकांचा आमची परंपरा व पद्धतींवर, तसेच आयुर्वेदाच्‍या क्षमतेवर असलेला विश्‍वास पाहून आम्‍हाला अभिमान वाटतो. आमच्‍या विकास धोरणाचा भाग म्‍हणून आम्‍ही आमच्‍या संदेशाचा प्रसार अधिकाधिक ग्राहकांपर्यंत पोहोचवण्‍यावर लक्ष केंद्रित केले आहे. यासह आम्‍हाला महाराष्‍ट्रात अघयावत फॉर्म्‍युला व सुधारित पॅकजिंगने युक्‍त चंद्रिका आयुर्वेदिक साबणाच्‍या पुनरागमनाची घोषणा करतांना आनंद होत आहे. चंद्रिका आयुर्वेदिक साबणाचा विलक्षण, तसेच गुणकारी आयुर्वेदिक फॉर्म्‍युलेशन यावर आमचा विश्‍वास आहे. आम्‍ही ग्राहकांना सर्वोत्तम सेवा देत राहू आणि प्रांतामध्‍ये आमची पोहोच वाढवू.”  

श्री. एस प्रसन्न राय, व्हाइस प्रेसिडंट – मार्केटिंग, विप्रो कन्झ्युमर अँड लाइटिंग म्हणाले, “ग्राहक त्‍वचेच्‍या काळजीसाठी पुन्‍हा एकदा आयुर्वेदाला प्राधान्‍य देत असल्‍याची आणि त्‍याबाबत ग्राहकांची रूची वाढत असल्‍याचे आम्‍हाला दिसून येत आहे. चंद्रिका नेहमीच भारतातील परंपरेच्‍या अग्रस्‍थानी राहिले आहे. अनेक पिढ्यांपासून ग्राहकांचा त्‍वचा आरोग्‍यदायी व तजेलदार राहण्‍यासाठी या ब्रॅण्‍डवर विश्‍वास आहे. आम्‍ही महाराष्‍ट्रामध्‍ये या मोहिमेचे पुनरागमन करताना अतिशय विश्‍वसनीय व काळाच्‍या परीक्षेवर खरे ठरलेले सोल्‍यूशन परत आणत आहोत, जे ग्राहकांना त्‍यांच्‍या मूळ संस्‍कृतीची आठवण करून देते आणि त्‍यांना #आपल्‍यादेशाचाग्‍लो देते. चंद्रिकाच्‍या ८० वर्षांहून अधिक काळाच्‍या वारसामधून महाराष्‍ट्रातील ग्राहकांना शतकांपासून आत्‍मसात असलेल्‍या आयुर्वेद कौशल्‍यावर आधारित अल्टिमेट स्किनकेअर सोल्‍यूशन देण्‍याची खात्री मिळते. चंद्रिकासाठी या नवीन उत्‍साहवर्धक अध्‍यायामध्‍ये आम्‍ही अस्‍सलता व विश्‍वसनीयतेच्‍या बांधिलकीसह महाराष्‍ट्रातील ग्राहकांप्रती आमची कटिबद्धता अधिक दृढ करण्‍यास उत्‍सुक आहोत.”  नवीन चंद्रिका साबणाचा ७५ ग्रॅमचा पॅक सर्वसाधारण दुकाने, मॉल्‍स आणि देशभरातील ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म्सवर रू. ३२ इतक्या एमआरपीमध्ये उपलब्ध आहे.

COMMENTS