Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

दहावी, बारावीच्या परीक्षेला 10 मिनिटे अतिरिक्त

पुणे : दहावी-बारावींच्या परीक्षा काही दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत. विद्यार्थ्यांना या परीक्षांच्या निर्धारित वेळेपेक्षा 10 मिनिटे अधिक वेळ पेपर सो

डॉ. आंबेडकरांचे कार्य कधीही विसरता येणार नाही : पंतप्रधान
चालू उद्घाटन सोहळ्यात कोसळला पूल, पाहा व्हिडिओ | LOK News 24
मधुमेहाला थांबविण्यासाठी त्रिसुत्रीचा वापर आवश्यक : डॉ. पंकज राणे

पुणे : दहावी-बारावींच्या परीक्षा काही दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत. विद्यार्थ्यांना या परीक्षांच्या निर्धारित वेळेपेक्षा 10 मिनिटे अधिक वेळ पेपर सोडवण्यासाठी दिला जाणार आहे. यामुळे मुलांना फायदा होणार आहे. या पूर्वी परीक्षार्थ्यांना प्रश्‍नपत्रिका वाचण्यासाठी तसेच परीक्षा दालनात प्रश्‍नपत्रिकांचे वाटप परीक्षेच्या निर्धारीत वेळेपूर्वी दहा मिनिटे आधी केल्या जात होते. दहावी आणि 12 वीच्या परिक्षाचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. या परीक्षेची जोरदार तयारी मुले करत आहेत.
बारावीची लेखी परीक्षा ही 21 फेब्रुवारी ते 23 मार्च दरम्यान, होणार आहे. तर, दहावीची लेखी परीक्षा 1 मार्च ते 26 मार्च या कालवधीत होणार आहे. या दोन्ही परीक्षा विद्याथ्यांच्या जीवनातील एक महत्वाचा टप्पा असतो. त्यामुळे मुलांसह पालकांची देखील परीक्षा असते. मुलांना उत्तर पत्रिका वाचता यावी तसेच त्याचा अंदाज घेता यावा यासाठी परीक्षा सुरू होण्याच्या आधी प्रश्‍न पत्रिका आणि उत्तर पत्रिकेचे वाटप केले जात होते. मात्र, पेपर फुटीच्या घटना घडल्या होत्या. यामुळे अशा घटना थांबवण्यासाठी व परीक्षा योग्य पद्धतीने पार पाडण्यासाठी परीक्षेच्या निर्धारीत वेळेपूर्वी दहा मिनिटे आधी प्रश्‍नपत्रिका वितरीत करण्याची पद्धत गेल्या वर्षीपासून रद्द करण्यात आली होती. यामुळे विद्यार्थ्यांना प्रश्‍न पत्रिका वाचून प्रत्यक्ष उत्तरे लिहिण्यासाठी उशीर लागत होता. त्यामुळे त्यांना वेळ कमी पडत होता. यामुळे मुलांना वेळ वाढवून देण्यात यावा अशी मागणी केली जात होती. ही मागणी लक्षात घेऊन परीक्षेच्या निर्धारित वेळेनंतर मुलांना आणखी 10 मिनिटे वाढीव वेळ दिला जाणार आहे. यामुळे त्यांना परीक्षा योग्य पद्धतीने देता येणार आहे.

COMMENTS