भीमा-कोरेगाव विजय स्तंभ हा जुलमी पेशव्यांचा त्वेषाने पराभव करणाऱ्या शहीद योध्यांच्या सन्मानार्
भीमा-कोरेगाव विजय स्तंभ हा जुलमी पेशव्यांचा त्वेषाने पराभव करणाऱ्या शहीद योध्यांच्या सन्मानार्थ उभारलेला स्तंभ आहे! १ जानेवारी १८१८ ला इतिहासातील सर्वाधिक सामाजिक अत्याचारी संस्थानिक सत्तेला कायमचे गाडले गेले. या विजयाच्या स्मरणार्थ उभारलेल्या विजय स्तंभावर ‘नाक’ हे विशेष नामाभिधान असणारी शहीदांची नावे आहेत. एकूण एकोणपन्नास शहीद वीरांमध्ये किमान बावीस नावे ही ‘नाक’ या विशेषनामाने संयुक्तिक आहेत. या नावाच्या इतिहासावरून आपणांस निश्चित असे म्हणता येते की, हे शहीद महार या जातीतून होते. महार या जातीच्या नावांमध्ये नाक किंवा नाग हे नामाभिधान कायम असायचे. परंतु, याबरोबरच आपण ही गोष्ट ही लक्षात ठेवली पाहिजे की, या युध्दात १६ महारेतर, काही राजपूत आणि दोन ऍंग्लो इंडियन देखील शहीद झाले आहेत. बाॅम्बे इन्फन्ट्री या सैन्य दलातील या शहीद वीरांमुळेच जुलमी पेशव्यांचि अठ्ठावीस हजारांपेक्षा अधिक असणाऱ्या प्रबळ सैन्यदलासह पराभव झाला. यातून आपणांस एक बाब खात्रीलायक म्हणता येईल की, भीमा-कोरेगाव च्या पेशवा विरोधातील युध्दात शूर महार सैन्यासह इतरही जातींचे वीर सैनिक लढले. मात्र, भीमा-कोरेगाव विजय स्तंभ हा महार शहीद सैनिकांच्या सन्मानार्थ यासाठी उभारला गेला की, पेशव्यांनी आपल्या जुल्मी सत्तेचा हुकूम ज्या महार जातीवर अनेक अपमानकारक नियम घालून चालवला होता, त्या महार सैन्याला सामाजिक जुलमाची टोचणं अधिक होती. त्यातून पेशवा बाजीराव दुसरा याच्या नेतृत्वाखालील पेशवाईचा खात्मा करण्याचा त्वेष महार सैन्यात अधिक होता. महार सैन्याची ही मानसिकता ब्रिटिश सैन्य सेनापती स्टाॅटन याने ओळखली होती. त्यामुळे महार सैन्याच्या नायकाकडेच त्याने पेशवा विरोधातील युध्दाची धुरा सोपवली. मध्यरात्री भीमा-कोरेगाव नदीचे विस्तिर्ण पात्र ओलांडून पेशव्यांच्या सैन्याला पळता भुई थोडी करणाऱ्या सिध्दनाक आणि रायनाक यांच्या सैन्य तुकडीने पेशव्यांचा मध्यरात्रीच पराभव केला आणि १ जानेवारी १८१८ ला पेशवाई इतिहासात कायमची गाडली गेली. पेशव्यांच्या विरोधात ब्रिटीशांनी युध्द का पुकारले, हा देखील प्रश्न यानिमित्ताने विचारला जाऊ शकतो. खरेतर, पेशवा ही एकमेव ब्राह्मणी राजवट होती, जी स्वतः ला मराठा म्हणुन बहुसंख्यांक भासवण्याचा प्रयत्न करित होती. ब्राह्मण समाज व्यवस्थेत कायम अल्पसंख्याक राहीला आहे; मात्र, ते स्वतः ला त्या-त्या काळानुसार बहुसंख्यांक समाज भासविण्यासाठी काही नामाभिधाने जोडून घेतात. जसे आजचे ब्राह्मण हे हिंदू नसूनही स्वतः ला हिंदू म्हणवून घेतात. त्यामागे त्यांची रणनीती एवढीच असते की, आपण बहुसंख्यांक असल्याचे भासवून खऱ्या अर्थाने बहुसंख्य असणाऱ्या हिंदू समाजावर आपल्याला जुलमी राज्य करता येते. आज याचे उदाहरण पाहिले तर बहुसंख्यांक हिंदू असणाऱ्या ओबीसींना राजकीय आरक्षण नाकारले जात आहे. हा ब्राह्मणी डाव आहे, जो हिंदूविरोधी आहे. असो. तर, मध्ययुगीन काळात याच ब्राह्मणी व्यवस्थेने स्वतःची ओळख मराठा अशी निर्माण केली होती. मध्यप्रदेशातील शिंदे, होळकर, बडोदा संस्थानचे गायकवाड आणि नागपूर चे भोसले अशी मराठा संस्थानिकांची नावे होती. परंतु, ती सर्व नावे ब्राह्मणेतर होती. महाराष्ट्रात जुलमी राजवट चालवणारे पेशव्यांनी स्वतः ला मराठा संबोधले जे वास्तव नव्हते. कारण आजच्या सारखेच तेव्हाही ते ब्राह्मणेतर असणाऱ्या या चारही संस्थांनांविरोधात असत. याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे भीमा-कोरेगाव हे युध्द संभवण्याचे मुख्य कारण बडोदा संस्थानचे गायकवाड यांच्या महसुलातून कपात पेशव्यांनी बंद करावी अशी समज ब्रिटीशांनी दिली होती. मात्र, ब्रिटीशांच्या या समजूतदार प्रस्तावाला पेशव्यांनी केवळ नाकारलेच नाही, तर, उन्मत्त होवून पुण्यातील ब्रिटीशांच्या कार्यालयालाच आग लावली होती. मराठा संस्थान असणाऱ्या गायकवाड संस्थानचे महसूलात वाटा घेण्याचा कोणताच अधिकार पेशव्यांना नसताना त्यांनी गायकवाड संस्थानवर अन्याय सुरू ठेवला होता. हा अन्याय ब्राह्मणी असणाऱ्या पेशव्यांचा मराठा संस्थानावर हुकूमत चालवण्याचा भाग होता. याचाच अर्थ ब्राह्मणी व्यवस्था ही एका बाजूला स्वतः ला बहुसंख्य समाजाचा भाग म्हणून भासवते. त्यातून त्यांना एक अघोषित संरक्षण मिळते आणि ते ज्यांच्याकडून ते सुरक्षित होतात त्याच ब्राह्मणेतर समाजावर अन्याय करतात. इतिहासात त्यांनी केलेला अन्याय भीमा-कोरेगाव विजयातील शहीद वीरांनी धारातिर्थी केला. यात महार, मराठा (आजच्या ओबीसींसह), राजपूत आणि ऍंग्लो इंडियन अशा सर्व स्तरातील शहीदांचा वाटा आहे. पेशव्यांच्या पराभवाने केवळ ब्राह्मणेतर समाजच सुखावला नाही, तर, ज्या ब्राह्मण स्त्रियांना त्यांनी अनन्वित छळले त्या ब्राह्मण स्त्रियांनी देखील पेशवाईच्या पराभवाचा जश्न साजरा केला, हा इतिहास आहे!
COMMENTS