Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कर्जत दुधसंघाच्या जागा हस्तांतरणास मंत्रिमंडळाची मंजुरी

कर्जत : खाजगी दूध उत्पादकांच्या तीव्र स्पर्धेतही गरीब व होतकरू शेतकऱ्यांना आधार देणारा सहकार महर्षी रावसाहेब ऊर्फ बाळासाहेब पाटील सहकारी दूध व्यवसायिक व प्रक्रिया संघ मर्यादित, कर्जत (जिल्हा अहिल्यानगर) याला मोठा दिलासा मिळाला आहे. कर्जत तालुका दुधसंघाच्या शीतकरण केंद्राच्या जागेसह कायमस्वरूपी हस्तांतरणासाठीचा प्रस्ताव मंत्रीमंडळाने मंजूर केला आहे अशी माहिती संस्थेचे चेअरमन मंगेश जगताप यांनी पत्रकारांना दिली. दिनांक ११ नोव्हेंबर २००२ च्या शासन निर्णयानुसार इतर सहकारी दूध संघांच्या धर्तीवर, शीतकरण केंद्र जागेसह बाजारभावाच्या ५० टक्के दराने कायमस्वरूपी मालकी तत्वावर देण्याबाबतचा प्रस्ताव विधान भवन, मुंबई येथे झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीत मांडण्यात आला. शासन शुद्धीपत्रक दिनांक २७/०६/२०२२ मधील नियम ७(ब) मध्ये शिथिलता देत, कर्जत येथील शासकीय दूध शीतकरण केंद्रातील यंत्रसामग्री, फर्निचर, वनसंपदा व इतर साहित्याची १०० टक्के रक्कम तसेच जमिनीच्या सध्याच्या रेडी-रेकनर मूल्याच्या ५० टक्के रकमेचा भरणा करून केंद्र कायमस्वरूपी हस्तांतरीत करण्यास मान्यता देण्यात आली. पत्रकारांना माहिती देताना मंगेश जगताप यांनी पुढे सांगितले की, या विषयाचा सातत्यपूर्ण पाठपुरावा सभापती प्रा. राम शिंदे यांच्या पुढाकाराने सुरू होता. त्यांच्या अध्यक्षतेखाली ४ नोव्हेंबर २०२५ रोजी विधान भवन, मुंबई येथे उच्चस्तरीय बैठक झाली होती. त्या बैठकीत दुग्धविकास मंत्री अतुल सावे यांनी विषय मंत्रीमंडळासमोर मांडण्याचे आश्वासन दिले होते. अखेर आज ५ मार्च २०२६ रोजी मंत्रीमंडळ बैठकीत प्रस्तावास मंजुरी मिळाली आहे. दुधसंघाचे चेअरमन मंगेश जगताप, व्हाइस चेअरमन दादासाहेब खराडे, संचालक काकासाहेब धांडे, शंकर देशमुख, भाऊसाहेब निंबाळकर, अंकुश दळवी, शामराव काळे, तात्याभाऊ घालमे, रामजी सूर्यवंशी, दत्तू तनपुरे, दत्तात्रय पाटील, शशिकला शेळके, छाया ढगे, कमल काळे, रामचंद्र गजरमल, वैशाली निंबाळकर, दादाजी धस, दुधसंघाचे सचिव शेख यांच्यासह कर्जत-जामखेड तालुक्यातील दूध उत्पादक संघांच्या प्रतिनिधींनी या निर्णयाचे स्वागत केले आहे.

 अंगात दैवी शक्ती आल्याचे भासवून महिलेवर केले वारंवार अत्याचार
स्व.विनायकराव मेटे यांच्या अस्थिकलशाचे पंचवटी नाशिक येथे विधिवत विसर्जन
बेंगळुरूतील 15 शाळांना बॉम्बने उडवण्याची धमकी

कर्जत : खाजगी दूध उत्पादकांच्या तीव्र स्पर्धेतही गरीब व होतकरू शेतकऱ्यांना आधार देणारा सहकार महर्षी रावसाहेब ऊर्फ बाळासाहेब पाटील सहकारी दूध व्यवसायिक व प्रक्रिया संघ मर्यादित, कर्जत (जिल्हा अहिल्यानगर) याला मोठा दिलासा मिळाला आहे. कर्जत तालुका दुधसंघाच्या शीतकरण केंद्राच्या जागेसह कायमस्वरूपी हस्तांतरणासाठीचा प्रस्ताव मंत्रीमंडळाने मंजूर केला आहे अशी माहिती संस्थेचे चेअरमन मंगेश जगताप यांनी पत्रकारांना दिली.

दिनांक ११ नोव्हेंबर २००२ च्या शासन निर्णयानुसार इतर सहकारी दूध संघांच्या धर्तीवर, शीतकरण केंद्र जागेसह बाजारभावाच्या ५० टक्के दराने कायमस्वरूपी मालकी तत्वावर देण्याबाबतचा प्रस्ताव विधान भवन, मुंबई येथे झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीत मांडण्यात आला. शासन शुद्धीपत्रक दिनांक २७/०६/२०२२ मधील नियम ७(ब) मध्ये शिथिलता देत, कर्जत येथील शासकीय दूध शीतकरण केंद्रातील यंत्रसामग्री, फर्निचर, वनसंपदा व इतर साहित्याची १०० टक्के रक्कम तसेच जमिनीच्या सध्याच्या रेडी-रेकनर मूल्याच्या ५० टक्के रकमेचा भरणा करून केंद्र कायमस्वरूपी हस्तांतरीत करण्यास मान्यता देण्यात आली.

पत्रकारांना माहिती देताना मंगेश जगताप यांनी पुढे सांगितले की, या विषयाचा सातत्यपूर्ण पाठपुरावा सभापती प्रा. राम शिंदे यांच्या पुढाकाराने सुरू होता. त्यांच्या अध्यक्षतेखाली ४ नोव्हेंबर २०२५ रोजी विधान भवन, मुंबई येथे उच्चस्तरीय बैठक झाली होती. त्या बैठकीत दुग्धविकास मंत्री अतुल सावे यांनी विषय मंत्रीमंडळासमोर मांडण्याचे आश्वासन दिले होते. अखेर आज ५ मार्च २०२६ रोजी मंत्रीमंडळ बैठकीत प्रस्तावास मंजुरी मिळाली आहे.

दुधसंघाचे चेअरमन मंगेश जगताप, व्हाइस चेअरमन दादासाहेब खराडे, संचालक काकासाहेब धांडे, शंकर देशमुख, भाऊसाहेब निंबाळकर, अंकुश दळवी, शामराव काळे, तात्याभाऊ घालमे, रामजी सूर्यवंशी, दत्तू तनपुरे, दत्तात्रय पाटील, शशिकला शेळके, छाया ढगे, कमल काळे, रामचंद्र गजरमल, वैशाली निंबाळकर, दादाजी धस, दुधसंघाचे सचिव शेख यांच्यासह कर्जत-जामखेड तालुक्यातील दूध उत्पादक संघांच्या प्रतिनिधींनी या निर्णयाचे स्वागत केले आहे.

COMMENTS