कालच जाहीर झालेल्या पोटनिवडणूकींचा निकाल आणि निवडणूक रणनितीकार मानले गेलेले प्रशांत किशोर यांच्याविषयी काॅंग्रेस च्या हंगामी राष्ट्रीय अध्यक्ष सोनिया
कालच जाहीर झालेल्या पोटनिवडणूकींचा निकाल आणि निवडणूक रणनितीकार मानले गेलेले प्रशांत किशोर यांच्याविषयी काॅंग्रेस च्या हंगामी राष्ट्रीय अध्यक्ष सोनिया गांधी यांनी केलेले विधान यांचा नेमका अर्थ काय निघतो, अशी जिज्ञासा कोणी बाळगली तर यातील अर्थबोध व्हायला लागतो. यासंदर्भात महाराष्ट्रापुरता विचार केला तर कोल्हापूर ची पोटनिवडणूक विद्यमान महाविकास आघाडीने जिंकून घेतली हे थेट म्हणता येईल. केंद्रीय सत्तेचे पाठबळ आणि राज्यात विधानसभेतील सर्वात मोठा पक्ष असणाऱ्या विरोधी पक्ष भाजपला सर्व साधनांचा वापर करूनही या निवडणुकीत विजय तक्ष जाऊद्या साधी चुरसही निर्माण करता आली नाही, हे सत्य आहे. काॅंग्रेस पक्षाकडे ही जागा कायम राहिली असली तरी तो महाविकास आघाडीचा एकत्रित विजय आहे. यापूर्वी पंढरपूर मध्येही पोटनिवडणूक झाली होती, त्यात भाजपाने विजय संपादन केला होता. त्यामुळे, पोटनिवडणुकीत पक्षांच्या भूमिंकांपेक्षा अनेक प्रकारची समिकरणे काम करीत असतात. पंढरपूर निवडणुकीत महाविकास आघाडीतूनच काहीतरी दगाफटका झाला असण्याची शक्यता जशी नाकारता येत नाही, तसं कोल्हापुरात मिळालेला विजय यातही देवेंद्र फडणवीस यांना त्यांच्याच पक्षातूनही काही सबक शिकविण्याचा प्रकार झालाच नसेल, असे म्हणता येणार नाही. परंतु, आपल्या चर्चेचा विषय कोल्हापूर आणि देशातील पोटनिवडणुकीत भाजपेतर विरोधी पक्षांना मिळालेला विजय आणि प्रशांत किशोर यांनी काॅंग्रेसचे सल्लागार म्हणून विधाने करू नये, तर त्यांनी थेट काॅंग्रेस पक्षात प्रवेश करून जे काही सांगायचं ते सांगावे. काॅंग्रेसच्या हंगामी अध्यक्षा असणाऱ्या सोनिया गांधींचे हे विधान निवडणूक रणनितीकार म्हणविल्या जाणाऱ्या प्रशांत किशोर यांना विनंती नसून आदेश आहेत, असा याचा अर्थ होतो. प्रशांत किशोर हे निवडणूक रणनितीकार म्हणून प्रसिद्ध असतीलही, परंतु, जनतेत थेट कोणतेही कार्य न करणाऱ्या या माणसाला भारतीय मतदारांची मने कशी कळतात, हे एक गौडबंगाल असेल का? खरे सांगायचे झाले तर, गौडबंगाल हा शब्द रहस्यमय या अर्थाने वापरला जात असला तरी किशोर यांच्या कार्याचे रहस्यं फार पूर्वीच उजागर झाले आहे. प्रशांत किशोर आंतरराष्ट्रीय भांडवलदार समुह खासकरून जे इस्त्राईलशी जुळलेले आहेत, अशा काही समुहांशी ते संबंधात असल्याचा जाहीर आरोप यापूर्वी झालेले आहेत. या आरोपात जर काही तत्थ्य असेल तर सोनिया गांधी यांनी त्यांना काॅंग्रेस प्रवेशाची दिलेली सूचना हा आदेशच मानावा लागेल. १९९१ नंतर जगात भांडवली सत्तेचा मार्ग निर्धोक झाला असला तरी अशा प्रकारची रिमोट सत्ता प्रत्येक देशात निर्माण करायची असेल तर त्यासाठी आंतरराष्ट्रीय राजकारण कार्यरत ठेवून त्या-त्या देशांच्या जनतेची मानसिकता एकदम सत्तेच्या विरोधात टोकाची झाली तर समन्वय ठेवण्यासाठी लोकशाही मार्गाने सत्ताबदल घडवूनही ती साध्य करावी लागते. पोटनिवडणुकीत काॅंग्रेसला मिळालेला विजय हा तेवढ्यापुरता मर्यादित राहणार नाही. सर्वसामान्य जनतेत भाजपच्या या पराभवाचे विश्लेषण एका वाक्यात आलें, ” ईव्हीएम मॅनेज झाला नाही.” याचा दुसरा अर्थ हाच होतो की, भारतीय जनमानस भाजप-मोदी यांच्या विरोधात आहे. ही बाब आंतरराष्ट्रीय पातळीवर असणाऱ्या भांडवलदार वर्गाच्या लक्षात आली आहे. शेतकरी आंदोलनातून देखील ही बाब स्पष्ट झाली आहे. त्यामुळे, वर्तमान केंद्र सरकार विषयी जनमत टोकाचे विरोधात गेल्याचे स्पष्ट होत असल्याचा संदेश यातून गेला आहे. प्रशांत किशोर यांची निवडणूक रणनिती हा फक्त प्रपोगंडा आहे. त्यांचे खरे काम आंतरराष्ट्रीय भांडवलदारांनी निर्माण केलेल्या संस्था करित आहेत. आता या संस्थांचे गोपनीय अहवाल २०२४ मध्ये काॅंग्रेसला ताकद देण्याची शिफारस करणारे असावेत, त्यामुळे, प्रशांत किशोर काॅंग्रेसविषयी दररोज विधाने करित आहेत. त्यात त्यांचे एक विधान खूप महत्त्वाचे आहे की, काॅंग्रेस हा देशातील एकमेव राजकीय पक्ष आहे, ज्याचा जनाधार भारतात प्रत्येक राज्यात आणि केंद्रशासित प्रदेशात आहे. त्याचवेळी भाजपाचा जनाधार फक्त सात-आठ राज्यात मर्यादित असल्याचेही त्यांनी सांगितले आहे. याचा अर्थ, २०२४ मध्ये काॅंग्रेसला बहुमत मिळालेच पाहिजे, असा संदेश तयार झाला असावा. सोनिया गांधी यांनी प्रशांत किशोर ला काॅंग्रेसविषयी सल्लागार सारखी विधाने न करता काॅंग्रेस प्रवेश करून बोलावं, असा एक गर्भित आदेश दिला आहे. या सर्व घटधाक्रमांना पाहीले तर येणारा काळ भाजपच्या कसोटीचा ठरणार आहे, हे निश्चित समिकरण समजावे !
COMMENTS