Homeताज्या बातम्यादेश

ब्रिजभूषण सिंह यांचा पाय खोलात

2 कुस्तीपटू, 1 रेफरी, कोचने दिली विरोधात साक्ष

नवी दिल्ली/प्रतिनिधी ः भारतीय कुस्ती संघाचे अध्यक्ष अणि भाजप खासदार असलेले ब्रिजभूषण शरण सिंह यांच्यावर कुस्तीपटू महिलांनी लैगिंक शोषणाचे आरोप के

समर्पित आयोगाद्वारे राजकीय पक्ष, सामाजिक संस्था आणि नागरिकांच्या निवेदनांचा स्वीकार
अजित पवार भाजपमध्ये जाणार ः अंजली दमानिया
राज्यपालांचा गैरसमज झाल असावा : महसूल मंत्री थोरात

नवी दिल्ली/प्रतिनिधी ः भारतीय कुस्ती संघाचे अध्यक्ष अणि भाजप खासदार असलेले ब्रिजभूषण शरण सिंह यांच्यावर कुस्तीपटू महिलांनी लैगिंक शोषणाचे आरोप केले असून, त्यांच्याविरोधात पोक्सो अंतर्गत गुन्हा देखील नोंदवण्यात आला आहे. यासोबतच ब्रिजभूषण यांच्याविरोधात 4 जणांनी साक्ष दिल्यामुळे ब्रिजभूषण सिंह यांच्यासमोरील अडचणीत वाढ झाली आहे.
एक ऑलिम्पियन, एक राष्ट्रकुल सुवर्णपदक विजेता कुस्तीपटू, एक आंतरराष्ट्रीय रेफरी आणि राज्यस्तरीय कोच यांनी भाजप खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांच्यावर कुस्तीपटूंच्या आरोपांना पुष्टी दिली आहे. दिल्ली पोलिसांनी या प्रकरणात चार राज्यांतील 125 संभाव्य साक्षीदारांचे जबाब नोंदवले आहेत. त्यापैकी हे 4 जण आहेत. 28 एप्रिल रोजी दिल्ली पोलिसांनी दोन एफआयआर नोंदवले होते. लैंगिक अत्याचाराची 15 तर अयोग्य ठिकाणी स्पर्शाची 10 प्रकरणे आहेत. दिल्ली पोलिसांच्या प्रवक्त्या सुमन नलवा यांना या चार साक्षीदारांबद्दल विचारले असता सांगितले की, आम्ही या प्रकरणात तपास किंवा पुराव्यावर भाष्य करू शकत नाही. अजूनही तपास सुरू आहे. एसआयटी या प्रकरणाची चौकशी करत असून, न्यायालयाला अहवाल सादर केला जाईल. तक्रारकर्त्यांपैकी एकाच्या प्रशिक्षकाने सांगितले की, कुस्तीपटूने ब्रिजभूषण यांना घटनेच्या 6 तासांनंतरच फोनवरून माहिती दिली. दिल्ली पोलिसांनी केलेल्या चौकशीदरम्यान दोन महिला कुस्तीपटू, एक ऑलिम्पियन आणि दुसरी कॉमनवेल्थ गेम्स पदक विजेती, यांनी कुस्तीपटूंच्या दाव्याला पुष्टी दिली. तक्रारदाराने लैंगिक छळाच्या घटनांची माहिती एका महिन्यानंतरच दिली होती.  रेफ्री हे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय सर्किटमध्ये मोठे नाव आहे. त्याने दिल्ली पोलिसांना सांगितले की, जेव्हा तो स्पर्धांसाठी देश-विदेशात जायचा तेव्हा महिला कुस्तीपटूंची ही अवस्था मला कळायची. दिल्ली पोलिसांनी महिला पोलिस कर्मचार्यांचा समावेश असलेले एक विशेष तपास पथक स्थापन केले, ज्याने लैंगिक छळाच्या घटना घडल्या त्या स्पर्धेत उपस्थित असलेल्यांबद्दल डब्ल्यूएफआयकडून माहिती मागवली.
दिल्ली पोलिसांनी बॉक्सर मेरी कोमच्या अध्यक्षतेखालील सरकारने नियुक्त केलेल्या निरीक्षण समितीचा अहवाल देखील सादर केला आहे, जी ब्रिजभूषणविरुद्ध लैंगिक छळाच्या तक्रारींची चौकशी करण्यासाठी स्थापन करण्यात आली होती. सूत्राने सांगितले की, एसआयटीने 158 लोकांची यादी तयार केली होती आणि त्यांनी पुरावे गोळा करण्यासाठी हरियाणा, उत्तर प्रदेश, झारखंड आणि कर्नाटकला भेटी दिल्या. आतापर्यंत त्यांनी 125 जणांचे जबाब नोंदवले असून त्यापैकी चार महिलांनी त्यांच्या जबाबात कुस्तीपटूंच्या आरोपांना पुष्टी दिली आहे.

COMMENTS