Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मुंबईमध्ये मराठीविरुद्ध अमराठीचा नवा संघर्ष

मांसाहारींना रुम भाड्याने देवू नका ः अमराठी सोसायट्यांची भूमिका

मुंबई/प्रतिनिधी : मुंबईसारख्या शहरामध्ये मराठी व्यक्तींना घरे नाकारण्याचे प्रमाण वाढतांना दिसून येत आहे. मुंबईतील मुलुंडमध्ये तृप्ती देवरुखकर या

महामोर्चा आणि पोलिस प्रशासन ! 
डोशातील चटणीला आक्षेप घेतल्याने मारहाण..तिघांना सक्तमजुरी
गॅसकटरने एटीएम फोडून 3 लाख चोरट्यांनी लांबवले

मुंबई/प्रतिनिधी : मुंबईसारख्या शहरामध्ये मराठी व्यक्तींना घरे नाकारण्याचे प्रमाण वाढतांना दिसून येत आहे. मुंबईतील मुलुंडमध्ये तृप्ती देवरुखकर या महिलेला गाळा नाकारण्यात आल्याची घटना समोर आल्यानंतर मुंबईमध्ये मराठीविरूद्ध अमराठी वाद टोकाला पोहचण्याची शक्यता आहे. कारण आता मुंबईतील अनेक ठिकाणी मांसाहार करणार्‍यांना घरे भाड्याने न देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अमराठी सोसायट्यांनी तशा प्रकारच्या सूचना एजंट्सना केल्याची माहिती समोर आली आहे.
अमराठी व्यक्तींच्या या भूमिकेमुळे मुंबईत धर्म, जात, पंथांच्या व्यक्तींना घरे नाकारण्यात येत असल्याचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत येण्याची शक्यता आहे. या प्रकरणात मुंबईतील कोणत्याच पक्षाचे नेते हस्तक्षेप करण्यास तयार नसल्याने हा वाद वाढतच जाण्याची शक्यता आहे. मुंबईतील अमराठी भागांमध्ये अनेकदा मांसाहार करणार्‍या किंवा जात, धर्म, पंथ आणि भाषेच्या आधारावरून स्पष्टपणे घरे नाकारली जातात. महानगर अशी ओळख असलेल्या मुंबईत मांसाहारी लोकांना अमराठी लोकांच्या सोसायटींमध्ये भाड्याने घर मिळत नाही. काही सोसायट्यांमध्ये मांसाहारींना प्रवेश निषिद्ध करण्यात आला आहे. घरांची खरेदी, विक्री किंवा भाड्याने घेण्यासाठी ऑनलाईन अ‍ॅप किंवा एजंट्सचा पर्याय देण्यात आला आहे. परंतु आता सोसायट्यांनी मांसाहारी लोकांना घरे विकली किंवा भाड्याने दिली जाणार नसल्याचे एजंट्सना सांगितल्याची माहिती आहे. याबाबत कोणताही कायदा नसल्याने आरोपींवर कुठलीही कार्यवाही होत नसल्याची सामान्य मुंबईकरांची भावना आहे.

शाकाहारी विरुद्ध मांसाहारी असा संघर्ष पेटण्याची चिन्हे – मुंबईत अमराठी आणि शाकाहार करणार्‍या लोकांचे वर्चस्व असलेल्या सोसायट्यांतून मांसाहार करणार्‍या ग्राहकांना रुम भाड्याने किंवा विकत न देण्याच्या सूचना विकसकांकडून इस्टेट एजंट्सना देण्यात आल्या आहे. दक्षिण मुंबईत काही लोकांना मांस न शिजवण्याच्या अटीवर घरं मिळाल्याची माहिती आहे. असा कोणताही लेखी किंवा कायदेशीर करार नसला तरी गरजेपोटी अनेक लोक मांसाहार करणं सोडत असल्याचं सांगण्यात येत आहे. मुंबईत मराठी विरुद्ध अमराठी असा वाद पेटलेला असतानाच आता येत्या काळात शहरात शाकाहारी विरुद्ध मांसाहारी असा संघर्ष पेटण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

COMMENTS