Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पोलिस उपअधीक्षक पथकासमोरच दोघांची जुंपली

अहमदनगर/प्रतिनिधी गुन्ह्याच्या तपासासाठी आलेल्या पोलिस उप अधीक्षक यांचे समोर दोघे एकमेकांना अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करून सार्वजनिक शांततेचा भंग कर

सेवानिवृत्त मुख्याध्यापक लावरे यांचा राज्यस्तरीय पुरस्काराने गौरव
शासकीय अधिकार्‍यांनी सामाजिक भावनेने काम करावे
साई समृद्धी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी वैभव आढाव

अहमदनगर/प्रतिनिधी गुन्ह्याच्या तपासासाठी आलेल्या पोलिस उप अधीक्षक यांचे समोर दोघे एकमेकांना अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करून सार्वजनिक शांततेचा भंग करून सार्वजनिक ठिकाणी एकमेकांना मारहाण करतांना दिसून आले. ही घटना सर्जेपुरा परिसरातील रामवाडी येथे घडली.
पोलिस नाईक किरण बनसोडे, अनिल कातकाडे, उपविभागीय पोलीस अधिकारी नगर शहर यांचेकडे तपासास असलेले  भारतीय.दंड विधान कायदा कलम  323, 504 सह अनुचित जाती जमाती प्रतिबंधक कायदा कलम  3 (1) (आर) (एस) या गुन्हयाचे घटनास्थळाचा पंचानामा करणे करीता मांगीर बाबा मंदिर रामवाडी, सर्जेपुरा, अ.नगर येथे गेले असता. त्या ठिकाणी अचानकपणे दोन मुले मांगीरबाबा मंदिरासमोर एकमेकाबरोबर झुंज करू लागले. तेव्हा त्यांना रोखण्यासाठी, किरण बनसोडे, पोलिस उपअधीक्षक अनिल कातकाडे, चालक पोलिस हवालदार सोमनाथ सायबर यांनी हस्तक्षेप करून त्यांना वेगळे करून त्यांना त्यांचे नाव गांव विचारले असता त्यांनी त्यांचे नाव गणेश भाऊसाहेब चखाले, ( वय- 19 वर्ष ) अरविंद रमेश चिप्पा, ( वय- 19 वर्ष दोन्ही रा.रामवाडी, सर्जेपुरा, अहमदनगर)असे सांगितले. तरी दि. 22  रोजी सायंकाळी मांगीरबाबा मंदिर समोर रामवाडी, सर्जेपुरा, अहमदनगर या सार्वजनिक ठिकाणी  गणेश चखाले, अरविंद  चिप्पा, एकमेकांना अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करून सार्वजनिक शांततेचा भंग करून सार्वजनिक ठिकाणी झुंज करताना प्रत्यक्ष मिळून आले. या प्रकरणी तोफखाना पोलिस ठाण्यात पोलिस नाईक किरण बनसोडे यांनी सरकार तर्फ दिलेल्या फिर्यादीवरुन दोघांविरुद्ध भा.द.वि.क 294.160 प्रमाणे गुन्ह्याची नोंद केली. 

COMMENTS