Homeताज्या बातम्यामनोरंजन

बॉलिवूडचे लोकप्रिय चित्रपट एडिटर संजय वर्मा यांचे निधन

मुंबई प्रतिनिधी - बॉलिवूडचे लोकप्रिय चित्रपट एडिटर संजय वर्मा यांचे निधन झाले आहे. त्यांच्या निधनाचे कारण अद्याप समजलेले नाही. मात्र त्यांच्या ज

नायजेरियात भीषण अपघात, बोट उलटून 26 जणांचा मृत्यू
महिलेच्या हत्येप्रकरणी 30 वर्षीय व्यक्तीला अटक
मणिपूरमधील उद्रेक

मुंबई प्रतिनिधी – बॉलिवूडचे लोकप्रिय चित्रपट एडिटर संजय वर्मा यांचे निधन झाले आहे. त्यांच्या निधनाचे कारण अद्याप समजलेले नाही. मात्र त्यांच्या जाण्याने चित्रपटसृष्टीला मोठा धक्का बसला आहे. संजय बॉलिवूडच्या प्रसिद्ध एडिटर्सपैकी एक होते. संजय यांनी अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले. संजय वर्मा यांनी हृतिक रोशनचे वडील राकेश रोशनच्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. यासोबतच त्यांनी ‘कोई मिल गया’ या सुपरहिट चित्रपटाचे एडिटिंगही केले असून अनेक पुरस्कार देखील जिंकले आहेत. निधनाच्या एक दिवस आधी संजय यांना त्यांच्या शेवटच्या गुजराती चित्रपट ‘द लास्ट शो’साठी 69 वा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. हा चित्रपट 2021 साली प्रदर्शित झाला होता आणि ऑस्करसाठीही शॉर्टलिस्ट झाला होता. इतकंच नाही तर त्यांनी त्यांच्या करिअरमध्ये 52 हून अधिक चित्रपटांचे एडिटिंग केले होते, त्यापैकी बहुतांश चित्रपट सुपरहिट ठरले. संजय यांचे काम हृतिक रोशनच्या वडिलांचा खूप आवडायचे. त्यांनी राकेश रोशन यांचे ‘खून भरी मांग’, ‘कोई मिल गया’, ‘कहो ना प्यार है’ अशा अनेक चित्रपटांचे एडिटिंग केले आहे. याशिवाय त्यांनी शाहरुख खान आणि सलमान खानचा ‘करण अर्जुन’ चित्रपटही एडिट केला होता. दिल वाले दुल्हनिया ले जायेंगे या चित्रपटाच्या फायनल लूकमागे संजय वर्मा यांचे योगदान होते.

COMMENTS