Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

बोगस बियाणांचा सुळसुळाट

शेतकर्‍यांची फसवेगिरी वाचविण्यासाठी कृषी विभागाने व्यापक मोहिम उघडण्याची गरज

नांदेड - खरीप हंगामाच्या पेरणीची सर्वत्र लगबग सुरू आहे. अशात अनेक शेतकरी बाजारात बियाणे खरेदीसाठी गर्दी करीत  आहेत. त्यात अनेक ठिकाणी बियाणांचा क

जळगाव जिल्ह्यातील जवानाला वीरमरण
दुचाकीवरुन ट्रिपल सीट जाणाऱ्या मित्रांचा अपघाती मृत्यू
रासायनिक शेतीकडून एकात्मिक पद्धतीकडे टप्प्या टप्प्याने संक्रमण काळाची गरज

नांदेड – खरीप हंगामाच्या पेरणीची सर्वत्र लगबग सुरू आहे. अशात अनेक शेतकरी बाजारात बियाणे खरेदीसाठी गर्दी करीत  आहेत. त्यात अनेक ठिकाणी बियाणांचा काळाबाजार होत असल्याच्या घटना समोर येत आहेत. बोगस बियाणांच्या सुळसुळाटामुळे शेतकर्‍यांची मोठी फसवणूक होऊ शकते. दुसरीकडे राज्य शासनाने बोगस बियाणांची विक्री करणार्‍यावर कठोर कारवाईचा इशारा दिला होता, मात्र याचा परिणाम झाला नसल्याचे दिसत आहे. राज्यातील वर्धा आणि नांदेड  जिल्ह्यात अशा बोगस बियाणांचा मोठा साठा आढळून आला आहे.
 खरीप हंगामाच्या पेरणीची सर्वत्र लगबग सुरू आहे. अशात अनेक शेतकरी बाजारात बियाणे खरेदीसाठी गर्दी करीत आहेत. त्यात अनेक ठिकाणी बियाणांचा काळाबाजार होत असल्याच्या घटना समोर येत आहेत. बनावट खते आणि बियाणांवर कृषी विभागाकडून कारवाई सुरू आहे मात्र बोगस बियाणे विक्रेते सर्वत्रच सक्रिय झाले आहेत. यासाठी शेतकर्‍यांचे नुकसान होण्यापुर्वीच अशा बियाणांविरोधात व्यापक मोहिम उघडण्याची गरज आहे. वर्धा जिल्ह्यातील सेवाग्राम पोलीस स्टेशन अंतर्गत म्हसाळा येथे एका ठिकाणी पोलिसांनी छापा टाकला. पोलीस, कृषी आणि महसूल विभागाचे अधिकारी रात्रीपासून घटनास्थळावर दाखल झाले. या छाप्यात 1 कोटी 51 लाख 82 हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी सहा जणांना ताब्यात घेतले आहे. गुजरातमधून बिटी कपाशीचे बियाणे आणून त्याचे वर्ध्यात रिपॅकिंग करीत होते. त्यानंतर कृषी सेवा केंद्रांच्या माध्यमातून वर्धा, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया आणि नागपूर जिल्ह्यांमध्ये त्याची विक्री केली जात असल्याची माहिती संशयित आरोपींनी दिली. वर्ध्याचे पोलीस अधिक तपास करीत आहेत. दरम्यान, नांदेड जिल्ह्यातही कृषी विभागाने बोगस बियाणे साठ्यावर कारवाई केली. नायगाव तालुक्यातील कोलंबी येथे बनावट सोयाबीन विक्रीसाठी घेऊन जाणार ट्रक पकडण्यात आला. यामध्ये पोलिसांनी 99 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या घटना शेतकर्‍यांप्रती चिंता वाढविणार्‍या आहेत.  याबाबत शासनाने विशेष करून कृषी विभागाने तपासण्यांचा वेग वाढविला पाहिजे.
शेतकर्‍यांनीही सतर्क रहावे
सध्या पेरणीची लगबग असल्याने, बोगस बियाणे विकणार्‍यांचे फावते आहे. शेतकर्‍यांनी याबाबत सतर्कता बाळगली पाहिजे. आपल्या भागातील कृषी सहाय्यक किंवा त्यातील जाणकारांना दाखवूनच बियाणे घ्यावे. बोगस बियाणे घेतले तर मोठे नुकसानदायी होऊ शकते. याशिवाय आपल्या परिसरातील ओळखीच्या दुकानदाराकडून खरेदी करण्याचा प्रयत्न करावा ज्यामुळे आपली फसवणूक टळू शकते. याशिवाय अशा पद्धतीचा थोडा जरी संशय आला तरी शेतकर्‍यांनी याची माहिती कृषी विभागात द्यायला हवी, यासाठी कृषी विभागाने व्यवस्था केलेली आहे

COMMENTS