Homeताज्या बातम्यादेश

भाजपची ‘मोदी का परिवार’ मोहीम

लोकसभा निवडणुकीसाठी भाजपची नवी टॅगलाईन

नवी दिल्ली ः लोकसभा निवडणुकीचे रणशिंग भाजपने फुंकले असून, आक्रमक प्रचार करण्यावर भाजप जोर देतांना दिसून येत आहे. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपन

मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम पुन्हा सुरु करणार
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त शांतता कमिटी बैठक
मोहन गायकवाड यांनी केला शरणपूर वृद्धाश्रमात वाढदिवस साजरा.

नवी दिल्ली ः लोकसभा निवडणुकीचे रणशिंग भाजपने फुंकले असून, आक्रमक प्रचार करण्यावर भाजप जोर देतांना दिसून येत आहे. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने ‘मैं भी चौकीदार’ या नावाच्या टॅगखाली संपूर्ण निवडणूक लढवली होती. 2024 मध्ये देखील भाजपने ‘मोदी का परिवार’ नावाचा नवा टॅग आणत या टॅगखालीच निवडणूक लढणार असल्याचे संकेत दिले आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी तेलंगणातील आदिलाबाद येथे एका सभेला संबोधित केले. 25 मिनिटांच्या भाषणात त्यांनी घराणेशाही, काँग्रेस, बीआरएस आणि तेलंगणाच्या विकासावर भाष्य केले. पंतप्रधान म्हणाले जेव्हा मी घराणेशाहीच्या राजकारणावर बोलतो तेव्हा विरोधी पक्षाचे लोक म्हणतात की मोदींना परिवार नाही. मी त्यांना सांगू इच्छितो की माझा देश, 140 कोटी देशवासीय माझे कुटुंब आहेत. मी माझ्या लहानपणी माझ्या देशवासियांसाठी घर सोडले, मी माझे आयुष्य त्यांच्यासाठी खपवेन. त्यामुळे भाजप ‘मोदी का परिवार’ नावाची मोहीम राबवतांना दिसून येत आहे. पंतप्रधान मोदी यांना केंद्रस्थानी ठेवूनच यावेळी भाजप ही लोकसभा निवडणूक लढवणार आहे. त्याचाच एक भाग म्हणून बिहारचे राष्ट्रीय जनता दलाचे (राजद) नेते लालूप्रसाद यादव यांच्या एका विधानानंतर भाजपाने समाजमाध्यांवर ‘मोदी का परिवार’ असे म्हणत विशेष मोहीम राबवण्यास सुरुवात केली. लालूप्रसाद यादव यांनी नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करताना ‘मोदींना स्वत:चा परिवार नाही’, असे विधान केले. त्यांच्या या विधानानंतर भाजपाकडून विशेष मोहीम राबवली जात आहे. भाजपच्या बड्या नेत्यांनी आपल्या समाजमाध्यमांच्या खात्यावर आपल्या नावापुढे ‘मोदी का परिवार’ असे लिहिले आहे. म्हणजे आम्ही सर्वजण मोदी यांच्या कुटुंबातील आहोत, असे म्हणत भाजपकडून लालूप्रसाद यादव यांच्या टीकेला उत्तर दिले जात आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, केंद्रीय मंत्री रवीसंकर प्रसाद यांच्यासारख्या बड्या नेत्यांपासून ते महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र पडणवीस, भाजपाचे नेते चंद्रकांत पाटील यांच्यासारख्या राज्यस्तरावरच्या नेत्यांनी आपल्या एक्स खात्यावर स्वत:च्या नावानंतर कंसात मोदी का परिवार असे लिहले आहे. त्यामुळे भाजप ‘मोदी का परिवार’ हाच संदेश या लोकसभा निवडणुकीतून देण्याची शक्यता आहे.

2019 मध्ये‘मैं भी चौकीदार’चा दिला होता नारा – 2019 सालच्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे नेते तथा खासदार राहुल गांधी यांनी ‘चौकीदार ही चौर हैं’ म्हणत नरेंद्र मोदी हे भ्रष्टाचारी असल्याचा दावा केला होता. त्यानंतर भाजपाने ‘मैं भी चौकीदार’ म्हणत काँग्रेसला उत्तर दिले होते. तेव्हा भाजपच्या जवळपास सर्वच नेत्यांनी आपल्या समाजमाध्यमांच्या खात्यांवर आपल्या नावापुढे ‘मैं भी चौकीदार’ असे लिहिले होते. याप्रमाणेच यंदाच्या निवडणुकीत ‘मोदी का परिवार’ म्हणत भाजपाकडून विरोधकांच्या टीकेला चोख प्रत्युत्तर दिले जात आहे. आणि हा या निवडणुकीचा नवा संदेश असल्याचे म्हटले जात आहे.

COMMENTS