Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

नवाब मलिक राहणार शरद पवारांसोबत

अजित पवार गटासोबत जाण्याचे नाकारले

मुंबई/प्रतिनिधी ः राष्ट्रवादी काँगे्रसचे नेते नवाब मलिक यांना सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजूर केल्यानंतर त्यांची तुरुंगातून सुटका करण्यात आली आह

नवाब मलिकांचा मुक्काम कोठडीतच
इब्राहम खानचा बाप कोण आहे हे नवाब मलिक यांनी सांगावे – नितीन चौगुले (Video)
सोमय्यांची धमकी पोकळ, मीच अधिवेशनात पोलखोल करणार- नवाब मलिक (Video)

मुंबई/प्रतिनिधी ः राष्ट्रवादी काँगे्रसचे नेते नवाब मलिक यांना सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजूर केल्यानंतर त्यांची तुरुंगातून सुटका करण्यात आली आहे. सुटका झाल्यानंतर नवाब मलिक शरद पवारांसोबत राहणार की, अजित पवार गटासोबत जाणार याविषयी चर्चा सुरू असतांना, गुरुवारी मलिक यांनी आपली भूमिका स्पष्ट करत आपण शरद पवारांसोबतच राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
नवाब मलिक यांनी शरद पवारांसोबत कायम राहण्याचा निर्णय घेतला आहे. मी कोणत्याही गटात जाणार नाही. मी मूळ राष्ट्रवादी काँग्रेससोबत राहणार आहे, असे ते म्हणालेत. मागील 18 महिन्यांच्या काळात माझ्यासह माझ्या कुटुंबाला मोठा मनस्ताप सहन करावा लागला. विशेषतः मूत्रपिंडाच्या दुर्धर आजारामुळे मला स्वतःलाही मोठा त्रास सहन करावा लागला. सद्यस्थितीत प्रकृती काळजी घेण्यास माझे प्राधान्य आहे. त्यानुसार मी शहरातील सर्वात चांगल्या डॉक्टरांकडून उपचार घेईल. त्यानंतर महिन्याभरात माझी प्रकृती सामान्य होईल असा मला विश्‍वास आहे, असेही मलिक यावेळी म्हणालेत. नवाब मलिक तुरुंगात गेल्यानंतर राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडल्या. राष्ट्रवादी काँग्रेसची शरद पवार व अजित पवार अशी 2 शकले पडली. त्यामुळे तुरुंगाबाहेर आल्यानंतर नवाब मलिक कोणत्या गटात राहणे पसंत करतात, याकडे अवघ्या राज्याचे लक्ष लागले होते. पण आता त्यांनी स्वतःच आपली भूमिका स्पष्ट केल्यामुळे यासंबंधीच्या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे. नवाब मलिक तुरुंगाबाहेर आल्यानंतर त्यांची राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी भेट घेतली. त्यानंतर दुसर्‍या दिवशी सुनील तटकरे व प्रफुल्ल पटेल यांनी त्यांची भेट घेतली. त्यानंतर छगन भुजबळ व स्वतः उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही त्यांची भेट घेतली होती.

COMMENTS