Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

भाजपकडून तीन वेळा राष्ट्रवादी पक्ष फोडण्याचा प्रयत्न

खासदार सुप्रिया सुळे यांचा गौप्यस्फोट

मुंबई/प्रतिनिधी ः राष्ट्रवादी काँगे्रसमध्ये जरी आज फूट पडली असली तरी, यापूर्वी भाजपने तीनवेळेस राष्ट्रवादी काँगे्रस पक्ष फोडण्याचा प्रयत्न केला ह

अजितदादा आणि आमच्यात मनभेद नाही
Supriya Sule : दिल्लीने कितीही त्रास दिला तरी महाराष्ट्राचा सह्याद्री दिल्लीपुढे झुकणार नाही (Video)
राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे दुसऱ्यांदा विशेष संसदरत्न महारत्न पुरस्कार

मुंबई/प्रतिनिधी ः राष्ट्रवादी काँगे्रसमध्ये जरी आज फूट पडली असली तरी, यापूर्वी भाजपने तीनवेळेस राष्ट्रवादी काँगे्रस पक्ष फोडण्याचा प्रयत्न केला होता, दोनदा त्यांना अपयश आले होते, मात्र त्यांनी यंदा रणनीती आखली आणि अजित पवार त्यांच्यासोबत गेल्याचा गौप्यस्फोट राष्ट्रवादी काँगे्रसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केला आहे. एका मुलाखतीमध्ये सुळे बोलत होत्या.
यावेळी बोलतांना सुळे म्हणाल्या, अजित पवार यांचा निर्णय निराशाजनक आहेच. पण, संवाद साधणे हा परत येण्याचा मार्ग असू शकत नाही आणि ते परत येतील का? यावर मला प्रतिक्रिया द्यायची नाही. पण मला विश्‍वास आहे की, आमच्या बाजूने आम्ही कुटुंब एकत्र ठेवण्याचा पूर्णपणे प्रयत्न करू. राजकारण घरात न आणण्याचा प्रयत्न आम्ही करू. लोकशाहीमध्ये प्रत्येक नागरिकाला दिलेल्या अधिकारानुसार त्यांनी स्वतःचा निर्णय घेतला. त्यामुळे राजकीय लढाई आम्ही आमच्या नात्यात का आणावी? ही तर वैचारिक लढाई आहे. आम्ही कुटुंब म्हणून एकत्र आहोतच; पण आमच्यात वैचारिक लढाई सुरूच राहील. शरद पवार आणि अजित पवारांच्या पुण्यातील गुप्त भेटीमुळे राज्यात चांगलाच गदारोळ उडाला. मविआतील शिवसेना, काँग्रेस या घटकपक्षांनीही या गुप्त भेटीवर जाहीर नाराजी व्यक्त केली. त्यावर सुप्रिया सुळे म्हणाल्या, लोकशाहीमध्ये कुणीही कुणाला भेटणे कसे काय टाळू शकतो? हे खरे आहे की, आम्ही आघाडीतील मित्रपक्षांना उत्तरदायी आणि जबाबदार आहोत. त्यामुळे त्यांना अस्वस्थता वाटत असेल, तर त्यात गैर काही नाही. ही आमची जबाबदारी आहे की, या भेटीमागील सत्य त्यांच्यापर्यंत पोहोचवले पाहिजे; जे आम्ही नक्कीच करू. आगामी लोकसभा निवडणुकीवर बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, मला कल्पना आहे की, माझ्या बारामती लोकसभा मतदारसंघातही आव्हाने निर्माण केली जातील. भाजप नेते, मंत्री दर 15 दिवसांनी मतदारसंघाचा दौरा करीत आहेत. ते आले तरी काही हरकत नाही. त्यांना स्पर्धा करू द्या. शेवटी निर्णय जनता घेणार आहे. सुप्रिया सुळे म्हणाल्या, आमच्या पक्षाचा एक गट सत्तेत आहे; तर दुसरा गट विरोधात आहे. पण, तांत्रिकदृष्ट्या पक्षात फूट पडलेली नाही. महाराष्ट्रातील काही आमदारांनी पक्षश्रेष्ठींची परवानगी न घेता, सत्तेत जाण्याचा निर्णय घेतला. शरद पवार हेच राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. जयंत पाटील प्रदेशाध्यक्ष आहेत. आम्ही हे निवडणूक आयोग आणि विधानसभा अध्यक्षांना कळवले असल्याचे देखील सुळे यांनी यावेळी सांगितले.

अजित पवार राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते – राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यापासून आजपर्यंत पक्षातील प्रमुख नेत्यांनी संभ्रम कायम ठेवला आहे. त्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पुन्हा एकदा गुगली टाकली आहे. भाजपसोबत सत्तेत सामिल झालेले उपमुख्यमंत्री अजित पवार हे राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात कुठलाही संभ्रम नसल्याचे सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये पुन्हा एकदा संभ्रम निर्माण झाला आहे.

COMMENTS