सातारा / प्रतिनिधी : मायणी (ता. खटाव) येथे मृत व्यक्तीची बनावट कागदपत्रे तयार केल्याच्या गुन्ह्यातील अटकपूर्व जामिनाचा अर्ज वडूजऐवजी अन्य न्यायाल
सातारा / प्रतिनिधी : मायणी (ता. खटाव) येथे मृत व्यक्तीची बनावट कागदपत्रे तयार केल्याच्या गुन्ह्यातील अटकपूर्व जामिनाचा अर्ज वडूजऐवजी अन्य न्यायालयात चालविण्यासाठी आमदार जयकुमार गोरे यांच्या वतीने जिल्हा न्यायालयात अर्ज करण्यात आला. त्यावर उद्या सुनावणी होणार आहे.
मृत भिसे यांची बोगस कागदपत्रे तयार करून फसवणूक केल्याप्रकरणी माण-खटावचे आमदार जयकुमार गोरे, दत्तात्रय कोंडिबा घुटुगडे (विरळी, ता. माण), महेश पोपट बोराटे (बिदाल, ता. माण) व अज्ञात दोघांवर वडूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत महादेव पिराजी भिसे यांनी दहिवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
या गुन्ह्यामध्ये अटकपूर्व जामीन अर्ज मिळण्यासाठी गोरे यांनी वडूज न्यायालयात अर्ज केला होता. परंतू या अर्जावरील सुनावणी अन्य न्यायालयात व्हावी. यासाठी त्यांनी सातारा न्यायालयात धाव घेतली आहे. याबाबतचा अर्ज त्यांनी जिल्हा न्यायालयात दाखल केला आहे. त्यावर सरकार पक्षाचे म्हणणे मागविण्यात आले आहे. सुनावणीसाठी उद्याची तारीख ठेवण्यात आली आहे.
COMMENTS