Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कृषिप्रदर्शनात मिळणार परिसंवादांची मेजवानी 

अभिता ऍग्रो एक्स्पो ; शेतकऱ्यांची उत्सुकता शिगेला

सिंदखेड राजा : राष्ट्रमाता जिजाऊ जन्मोत्सवानिमित्त सिंदखेड राजा येथे १२ ते १५ जानेवारीदरम्यान आयोजित राज्यस्तरीय कृषी महोत्सवात विविध विषयांवरील

लिपस्टिकने भिंतीवर लिहून काढली पतीच्या अत्याचाराही कहाणी, मग गळफास घेत विवाहितेची आत्महत्या.
अहमदनगर :अहमदनगर जिल्ह्यातील एका बड्या मंत्र्यांचा भ्रष्टाचार बाहेर येणार- राधाकृष्ण विखे पाटील | LokNews24
भाजप-मनसेचा अ‍ॅडजेस्टमेंट ‘फॉर्म्युला’

सिंदखेड राजा : राष्ट्रमाता जिजाऊ जन्मोत्सवानिमित्त सिंदखेड राजा येथे १२ ते १५ जानेवारीदरम्यान आयोजित राज्यस्तरीय कृषी महोत्सवात विविध विषयांवरील परिसंवाद आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी मिळणार आहे. त्यामुळे   शेतकऱ्यांची उत्सुकता शिगेला पोहचली असून कृषी महोत्सवाकडे नजरा लागल्या आहेत.  

कृषी विभाग व बुलढाणा कृषी विज्ञान केंद्राच्या सहकार्याने अभिता ऍग्रो इंडस्ट्रीजच्यावतीने येथील मातोश्री लॉन्सच्या बाजूला या राज्यस्तरीय कृषी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. १२ जानेवारी रोजी प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत कृषी महोत्सवाचे उदघाटन होणार आहे. चर्चा सत्र, कार्यशाळा यासह कृषीविषयक  प्रदर्शनांचा लाभ शेतकऱ्यांना घेता येणार आहे.  १३ जानेवारी रोजी सकाळी ११ ते १२ वाजेदरम्यान जिल्ह्यातील प्रगतीशील शेतकऱ्यांचा सत्कार समारंभ होणार आहे. दुपारी १२ वाजता सिंचन संस्कृती विषयावर सिंदखेड राजा येथील सुधाकरराव चौधरी मार्गदर्शन करणार आहेत.

दुपारी १ ते २ प्रक्रिया उद्योगाबाबत सीताबाई मोहिते मार्गदर्शन करणार आहेत. दुपारी २ ते ३ कडधान्य कायदेशीर शेती या विषयावर अहमदनगर येथील दत्तात्रय वने आणि दुपारी ३ ते ५ शाश्वत शेती पद्धतीवर वर्धा येथील गोपाळ अग्रवाल मार्गदर्शन करणार आहेत. सायंकाळी ५ ते ७ वाजेदरम्यान महाराष्ट्राची लोकधारा हा लावणीचा बहारदार सांस्कृतिक कार्यक्रमात रंगत आणणार आहे.  कृषी महोत्सवाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांच्यावतीने करण्यात आले आहे. 

पशुपक्षी प्रदर्शन ठरणार आकर्षण– बुलढाणा जिल्ह्यात प्रथमच एवढे मोठे राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन आयोजित होत आहे. जिल्ह्यातील नागरिकांच्या मनात याविषयी कुतूहल निर्माण झाले आहे. १४ जानेवारीला दुपारी १ ते ५ वाजेदरम्यान आयोजित पशुपक्षी प्रदर्शन हे कृषी महोत्सवाचे प्रमुख आकर्षण ठरणार आहे. विविध प्रजातींचे पक्षी आणि प्राणी पाहण्याची संधी शेतकऱ्यांसह नागरिकांना मिळणार आहे. १५ जानेवारी रोजी दुपारी ३ ते ५ वाजेदरम्यान समारोपीय कार्यक्रम व बक्षीस वितरण समारंभ होणार आहे.

COMMENTS