Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

थोरातांचा राजीनामा मान्य करण्याचा प्रश्‍नच नाही

काँगे्रस नेते एच.के. पाटील यांनी घेतली बाळासाहेब थोरातांची भेट

मुंबई/प्रतिनिधी ः महाराष्ट्राच्या काँगे्रसमध्ये काही दिवसांपूर्वी नाशिक पदवीधर निवडणुकीनिमित्त उद्धभवलेला संघर्ष आणि त्यानंतर काँगे्रस नेते बाळास

नव्याने इम्पेरिकल डेटा गोळा करणार
सरकारी कर्मचारी दुसर्‍या दिवशीही संपावर
Ahmednagar : खाजगी हॉस्पिटलला जवळपास सहा कोटी रुपयांचा दणका | LOKNews24

मुंबई/प्रतिनिधी ः महाराष्ट्राच्या काँगे्रसमध्ये काही दिवसांपूर्वी नाशिक पदवीधर निवडणुकीनिमित्त उद्धभवलेला संघर्ष आणि त्यानंतर काँगे्रस नेते बाळासाहेब थोरात यांनी विधिमंडळ गटनेतेपदाचा राजीनामा देत, काँगे्रसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासोबत काम करणे अशक्य असल्याचे सांगितले होते. त्यानंतर महाराष्ट्राचे काँगे्रसचे प्रभारी एच.के. पाटील यांनी थोरात यांची भेट घेतली. त्यानंतर माध्यमांशी बोलतांना ते म्हणाले की, थोरातांचा राजीनामा मान्य करण्याचा प्रश्‍नच नाही.
या भेटीनंतर पाटील म्हणाले की, मी थोरातांचे पूर्ण ऐकून घेतले. काही दिवसांपूर्वीच मी काँग्रेस अध्यक्षांना भेटलो होतो. याबाबत सविस्तर चर्चा झाली. तसेच राज्यात झालेले गैरसमज त्यांच्यापर्यंत पोहोचवले. मागील काही दिवसांत झालेले गैरसमज काँग्रेस पक्षाचे कुटुंबीक आहेत. या समस्या लवकरच सोडवण्यात येतील. तसेच थोरात रायपूर येथे होणार्‍या पक्षाच्या बैठकीला उपस्थित राहणार असल्याचेही पाटील यांनी म्हटले. दरम्यान आमचा अंतर्गत प्रश्‍न आहे. बाळासाहेब थोरात यांचा राजीनामा मान्य करण्याचा विषयच येत नाही. खुद्द मी थोरातांना विनंती केली की, तुम्ही काँग्रेसच्या बैठकीला उपस्थित राहा. त्यानंतर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि थोरात यांची भेट होणार आहे. तसेच थोरात यांचा राजीनामा मंजुर झाला नसल्याचेही पाटील यांनी म्हटले आहे.

COMMENTS