Homeताज्या बातम्यादेश

बिपरजॉय करणार रौद्ररुप धारण

पाकिस्तानमध्ये चक्रीवादळात 34 जणांचा मृत्यू

नवी दिल्ली/प्रतिनिधी : अरबी समुद्रात तयार झालेले बिपरजॉय चक्रीवादळ महाराष्ट्राच्या वेशीवर येवून ठेपले असून, आगामी 12 तासांमध्ये ते रौद्ररूप धारण

३१ डिसेंबरपर्यंत राज्यातील ४० नेत्यांचे घोटाळे बाहेर काढणार : किरीट सोमय्यांचा इशारा
अवैध धंद्यांवर कर्जत पोलिसांची मोठी कारवाई
चक्क उडत्या विमानात त्यांनी बांधली लग्नगाठ

नवी दिल्ली/प्रतिनिधी : अरबी समुद्रात तयार झालेले बिपरजॉय चक्रीवादळ महाराष्ट्राच्या वेशीवर येवून ठेपले असून, आगामी 12 तासांमध्ये ते रौद्ररूप धारण करणार असल्यामुळे, महाराष्ट्रासाठी हे बारा तास महत्वाचे असणार आहेत. त्यानंतर हे चक्रीवादळ सौराष्ट्र-कच्छच्या किनार्‍यावर धडकेल, असा इशारा हवामान खात्याने दिला आहे.
यासंदर्भात अधिक माहिती देतांना डॉ. आनंद कुमार दास म्हणाले की, बिपरजॉय चक्रीवादळ सध्या मध्य अरबी समुद्र तसेच समुद्रात लगतच्या ईशान्य भागात सक्रीय असून ते लवकरत अधिक तीव्र रुप धारण करणार आहे. त्यानंतर ते उत्तरेकडं सरकेल आणि सौराष्ट्र, कच्छच्या दिशेने जाईल, 15 जूनच्या सकाळी ते सौराष्ट्र आणि कच्छच्या किनार्‍यावर धडकेल. बिपरजॉय चक्रीवादळाने रौद्र रूप धारण केले असून, या चक्रीवादळाने पाकिस्तानमध्ये थैमान घातले आहे. अनेक भागांमध्ये सोसाट्याच्या वार्‍यासह मुसळधार पावसाच्या सरी कोसळत आहेत. वादळाने रौद्र रुप धारण केल्याने आतापर्यंत 34 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. तसेच 145 जण वादळाच्या तडाख्यामुळे गंभीर जखमी झाले आहेत.
बिपरजॉय चक्रीवादळाने तीव्र रुप धारण केले आहे. यात बिपरजॉय अक्षांश 17.4 एन आणि लांब 67.3 ई, मुंबईपासून सुमारे 600 किमी अंतरावर आहे. तर पोरबंदरच्या 530 किमी अंतरावर हे चक्रीवादळ आहे. तसेच कराचीपासून 830 किमी अंतरावर केंद्रीत होत आहे. 15 जून रोजी वादळ दुपारच्या सुमारास पाकिस्तान आणि लगतच्या सौराष्ट्र आणि कच्छ किनारपट्टीजवळ पोहचणार आहे. प्रांतीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी पाकिस्तानच्या बन्नू, दिखान, लक्की मारवत आणि करक या जिल्ह्यांना पावसाने झोडपलं आहे. त्यामुळे यात मोठ्या प्रमाणावर जीवितहानी झाल्याचे दिसत आहे. सोसाट्याच्या वार्‍यामुळे अनेक घरांचे छत उडून गेले. यासह काही घरांच्या भिंती देखील कोसळल्या. तसेच रस्त्यावर जागोजागी झाडे उनमळून पडली आहेत. जखमींची संख्या सध्या 145 आहे. मात्र हा आकडा 15 जूनपर्यंत आणखीन वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रशासनाने या दुर्घटनेत पुनर्वसन आणि मदत कार्यांसाठी 40 दशलक्ष रुपये जारी केले आहेत. वादळाच्या तीव्रतेने मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती अधिकार्‍यांनी व्यक्त केली आहे. दरम्यान, सोसाट्याच्या वार्‍यामुळे मुंबई विमानतळावरील कामकाजावर परिणाम झाला. विमानतळाची धावपट्टी 9/27 तात्पुरती बंद करण्यात आली होती. अनेक उड्डाणे रद्द करण्यात आली. काही इतरत्र वळवण्यात आले. काहींना उशीर झाला. शेकडो प्रवासी नाराज झालेले दिसले. मात्र, किती उड्डाणे प्रभावित झाली हे अद्याप कळू शकलेले नाही. चक्रीवादळ 15 जूनपर्यंत ते गुजरातमधील मांडवी आणि पाकिस्तानमधील कराची दरम्यानच्या किनार्‍यावर हे चक्रीवादळ पोहोचण्याची शक्यता आहे आहे. या दरम्यान 125-135 किमी प्रतितास वेगाने वारे वाहतील, जे 150 किमी प्रतितास पर्यंत पोहोचू शकतात. पोरबंदर, गीर-सोमनाथ आणि वलसाडमध्ये एनडीआरएफला कोणत्याही धोक्याचा सामना करण्यासाठी तैनात करण्यात आले आहे. त्याचवेळी कराची बंदराने रेड अलर्ट जारी केला आहे.

मुंबईतील विमानसेवा प्रभावित   – बिपरजॉय चक्रीवादळाचा तडाखा महाराष्ट्रात बसण्यापूर्वी जोरदार वारे सुटले असून, यामुळे सोमवारी मुंबई विमानतळावरील विमानसेवा चांगलीच प्रभावित झाल्याचे दिसून आले. त्यामुळे सोमवारी अनेक उड्डाणे रद्द करण्यात आल्यामुळे प्रवाशांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला. चक्रीवादळ हळूहळू पश्‍चिम-उत्तर दिशेकडे सरकत असून, त्याचा परिणाम राजस्थान, गुजरात आणि महाराष्ट्राच्या किनारी भागात दिसू लागला आहे. चक्रीवादळ 15 जूनपर्यंत गुजरातमध्ये पोहोचण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. सौराष्ट्र, कच्छसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. सोमवारी ठाणे, रायगड, मुंबई आणि पालघरमध्ये 45-55 किमी प्रतितास वेगाने मुसळधार पाऊस आणि सोसाट्याचा वारा वाहतांना दिसून आला.

COMMENTS