Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सलमान खानला हायकोर्टाचा मोठा दिलासा

प्राणघातक हल्ला प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय

मुंबई: अभिनेता सलमान खानला मुंबई उच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. अंधेरी मेट्रोपॉलिटन कोर्टाने सलमानविरुद्ध बजावलेले समन्स फेटाळत हायको

सलमान खानचा ‘गजनी’ लूक व्हायरल
सलमान खानच्या वकिलाला धमकीचं पत्र
सलमान खानच्या जीवनावरील डॉक्‍युड्रामाचे काम जोरात सुरू (Video)

मुंबई: अभिनेता सलमान खानला मुंबई उच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. अंधेरी मेट्रोपॉलिटन कोर्टाने सलमानविरुद्ध बजावलेले समन्स फेटाळत हायकोर्टाने संपूर्ण प्रकरणच फेटाळले आहे. सलमान खानवर २०१९ साली पत्रकाराशी गैरवर्तन आणि धमकी दिल्याचा आरोप करण्यात होता. न्यायमूर्ती भारती डांगरे यांच्या एकल खंडपीठाने हा निर्णय दिला. सलमानवर पत्रकार अशोक पांडेंनी धमकवल्याचा आरोप होता. आता मुंबई उच्च न्यायालयाने सलमानविरोधातील या प्रकरणातील एफआयआर रद्द करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे सलमानला अंधेरी कोर्टात हजर राहावे लागणार नाही, उच्च न्यायालयाने त्याच्याविरोधात दाखल असणारी तक्रार चुकीची असल्याचे म्हणत हे प्रकरण रद्द केले आहे.

पत्रकार अशोक पांडे अंधेरीमध्ये सलमानचा व्हिडिओ करत होते, तेव्हा त्यांच्यासोबत गैरवर्तन केल्याचा आरोप सलमान खान आणि त्याच्या बॉडिगार्ड नवाझ शेखवर ठेवण्यात आला होता. मात्र आता मुंबई उच्च न्यायालयाने हे आरोप फेटाळून लावले आहेत. पत्रकाराने अभिनेत्याविरोधात दाखल केलेल्या तक्रारीत म्हटले होते की, सलमानने केवळ गैरवर्तन केले नाही तर त्याचा मोबाइलही हिसकावला होता. या प्रकरणी अशोक पांडे यांनी यापूर्वी अंधेरी येथील दंडाधिकाऱ्यांकडे तक्रार केली होती. त्यावर अंधेरी मेट्रोपॉलिटन कोर्टाने सलमानला समन्स पाठवले होते. यावर सलमानने उच्च न्यायालयात धाव घेतली. गेल्या वर्षी मुंबई उच्च न्यायालयाने अभिनेत्याला दिलासा देत समन्सला स्थगिती दिली होतीनेमकं काय घडलं होतं प्रकरण? सलमान खान अनेकदा मुंबईच्या रस्त्यावर सायकल चालवण्यासाठी जायचा. कधी त्याचे अंगरक्षकही त्याच्यासोबत असायचे, तर कधी तो एकटाच फिरायचा. २०१९ साली सलमान असाच एकदा सायकलिंगसाठी गेला होता, तेव्हा पत्रकाराने त्याच्या मोबाइलमध्ये व्हिडिओ शूट केला. त्यावेळी सलमानने पत्रकाराचा फोन हिसकावला. पत्रकाराच्या मते, त्यांनी अभिनेत्याच्या गार्ड्सची परवानगी घेतलेली आणि तरीही सलमानने त्याच्याशी गैरवर्तन केले.

COMMENTS