Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

शरद पवारांचा पुन्हा यू टर्न

अजित पवारांच्या परतीचे दोर कापले

पुणे/प्रतिनिधी ः राष्ट्रवादी काँगे्रसमध्ये उभी फूट पडून अजित पवार गट भाजपसोबत सत्तेत गेला असला तरी, पक्षात कोणतीही फूट नसल्याचा दावा पक्षाचे सर्व

Live : जालना येथील सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालयाच्या नूतन वास्तुचा लोकार्पण सोहळा| LOKNews24
नाशिकमध्ये पुन्हा बर्निंग बसचा थरार
धनंजय मुंडे यांना जिल्ह्यातील शेतकर्‍यांवर असणारे प्रेम दाखवण्याची मोठी संधी-पुजा मोरे

पुणे/प्रतिनिधी ः राष्ट्रवादी काँगे्रसमध्ये उभी फूट पडून अजित पवार गट भाजपसोबत सत्तेत गेला असला तरी, पक्षात कोणतीही फूट नसल्याचा दावा पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवारांकडून सातत्याने करण्यात येत असतांना, शुक्रवारी त्यांनी अजित पवार आमचेच नेते असल्याचे वक्तव्य केले होते. मात्र काही तासानंतर त्यांनी आपण तसे म्हटलोच नाही, असा दावा करत घुमजाव केले.
शरद पवारांच्या या भूमिकेमुळे कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम असतांनाच, त्यांनी  हटले आहे की, ’अजित पवारांना पहाटेच्या शपथविधीनंतर एकदा संधी दिली होती. त्यानंतर आता संधी मागायची नसते आणि मागितली तर ती द्यायचीही नसते,’ असे ते म्हणालेत. त्यांच्या या विधानामुळे अजित पवारांसाठी राष्ट्रवादीत परतण्याची कवाडे कायमची बंद झाल्याची चर्चा सुरू झाली आहे. यावेळी त्यांना तुम्ही अजित पवारांना पक्षात पुन्हा संधी देणार का? असा प्रश्‍न केला असता त्यांनी संधी मागितली तरी द्यायची नसते, असे ठणकावून सांगितले. ते म्हणाले की, एकदा एखादी भूमिका घेतली असेल, करेक्शन केली असेल, तर ती संधी झाली. एकदा पहाटेचा शपथविधी झाला होता. तो दोन लोकांचा होता. त्यात आमचेही एक सहकारी होते. त्यावेळी आम्ही निर्णय घेतला होता. त्यानंतर त्यांनी माझ्याकडून जे झाले ते योग्य नव्हते, आता पुन्हा त्या मार्गाने जाणार नाही असे स्पष्ट केले होते. त्यामुळे त्यांना संधी देण्यात आली होती. पण संधी वारंवार मागायची नसते आणि मागितली तर ती द्यायची नसते, असे शरद पवार म्हणाले. त्यांच्या या भूमिकेमुळे अजित पवारांचे परतीचे दोर कापले गेल्याचे म्हटले जात आहे. तसेच पवारांनी यावेळी पक्षात फूट पडली नसल्याचा पुनरुच्चारही केला. पवारांना यावेळी तुम्ही पक्षात फूट पडली नसल्याचा दावा करता, मग निवडणूक आयोगाकडे का गेलात? असा स्पष्ट प्रश्‍न करण्यात आला. त्यावर ते म्हणाले की, तुम्ही आमच्या पक्षात असाल आणि तुम्ही एखादी चुकीची भूमिका घेतल्यामुळे मी तुमच्यावर कारवाई केली असेल, तर त्याचा अर्थ पक्षात फूट पडल्याचा होत नाही, असे ते म्हणाले.
दरम्यान, सकाळी बारामतीमध्ये बोलतांना शरद पवार म्हणाले होते की,अजित पवार हे आमचेच नेते आहेत. त्यांनी वेगळी भूमिका घेतली म्हणून पक्ष फुटला असे होत नाही. जेव्हा मोठा गट पक्षातून बाहेर पडतो तेव्हा फुट म्हणावी लागेल. दरम्यान, पवार यांच्या या व्यक्तव्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे. दोन दिवसांपूर्वी सुप्रिया सुळे यांनी देखील याच प्रकारचे विधान केले होते. मात्र दुपारी शरद पवार यांनी घुमजाव करत आपण तसे म्हटलोच नाही, असे म्हटले आहे.

शरद पवार लवकरच भाजपला पाठिंबा देतील : बावनकुळे – अजित पवार आमचेच नेते आहेत, ते भाजपसोबत गेले म्हणून पक्षात फूट पडली असे होत नाही, शरद पवारांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. पवारांच्या या वक्तव्यानंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. थोड्याच दिवसांत शरद पवार आणि सुप्रिया सुळे देखील मोदी सरकारला पाठिंबा देतील, असे वक्तव्य बावनकुळे यांनी केले आहे.

सत्ताधार्‍यांना दुष्काळ, पाणी प्रश्‍नांची जाण नाही – देशाची व राज्याचीही सत्ता ज्यांच्या हाती आहे. त्यांना संकटग्रस्त जनता, दुष्काळ, पाणी प्रश्‍नाची जाण नाही. या लोकांना दिलासा देण्याची जबाबदारी राज्यकर्त्यांची असताना, ते याकडे ढुंकूनही पाहत नसल्याची टीका खासदार शरद पवार यांनी केली. दहिवडीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्ता संवाद मेळाव्यात ते बोलत होते.

COMMENTS