द्रौपदी मुर्मू देशाच्या नव्या राष्ट्रपती; राष्ट्रपतीपदी प्रथमच आदिवासी महिला

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

द्रौपदी मुर्मू देशाच्या नव्या राष्ट्रपती; राष्ट्रपतीपदी प्रथमच आदिवासी महिला

नवी दिल्ली/प्रतिनिधी : राष्ट्रपतीपदासाठी झालेल्या निवडणुकीत एनडीएच्या उमेदवार द्रौपद्री मुर्मू या विजयी ठरल्या आहेत. मुर्मू या देशाच्या 15 व्या राष्ट

महिला नग्न धिंड प्रकरणाचा जाहीर निषेध- प्रा. सुशिलाताई मोराळे
पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळाला विरोध
लाव रे व्हिडिओ म्हणणाऱ्यांचा व्हिडिओ आता व्हायरल होतोय |

नवी दिल्ली/प्रतिनिधी : राष्ट्रपतीपदासाठी झालेल्या निवडणुकीत एनडीएच्या उमेदवार द्रौपद्री मुर्मू या विजयी ठरल्या आहेत. मुर्मू या देशाच्या 15 व्या राष्ट्रपती म्हणून शपथ घेणार आहेत. राष्ट्रपतीपदावर देशाच्या इतिहासात प्रथमच आदिवासी व्यक्ती विराजमान होणार आहे. या निवडणुकीत एनडीए पुरस्कृत उमेदवार द्रौपदी मुर्मू विजयी झाल्या असून यूपीए पुरस्कृत उमेदवार यशवंत सिन्हा पराभूत झाले. या निवडणुकीसाठी 99 टक्के लोकप्रतिनिधींनी आपला मतदानाचा हक्क बजावलेला होता. देशातील 10 राज्ये आणि एका केंद्रशासित प्रदेशात 100 टक्के मतदान पार पडले होते. राष्ट्रपतीपदासाठी 771 खासदार आणि 4025 आमदारांसह 4796 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला होता.
राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीमध्ये चांगलीच चुरस निर्माण झाली होती. अधिकाधिक पाठिंबा मिळावा म्हणून मुर्मू आणि यशवंत सिन्हा यांनी देशभर दौरे केले होते. मात्र या निवडणुकीमध्ये मुर्मू यांचा विजय झाला. या विजयासह मुर्मू यांना देशाच्या दुसर्‍या महिला राष्ट्रपती होण्याचा मान मिळाला आहे. त्या येत्या 25 जुलै रोजी राष्ट्रपतीपदाचा पदभार स्वीकारतील. याआधी प्रतिभाताई पाटील यांना पहिल्या महिला राष्ट्रपती होण्याचा मान मिळाला होता.
मतमोजणीच्या तिन्ही फेरीत द्रौपद्री मुर्मू या आघाडीवर होत्या. तिसर्‍या फेरीची मतमोजणी पूर्ण झाल्यानंतर द्रौपदी मुर्मू विजयी झाल्याची घोषणा करण्यात आली. तिसर्‍या फेरीच्या मतमोजणीत त्यांना राष्ट्रपती होण्यासाठी आवश्यक असलेली 50 टक्के मते मिळाली आहेत. तिसर्‍या फेरीतील मतमोजणीबाबत बोलायचे झाले तर त्यात एकूण 1,333 मते पडली. ज्याचे मूल्य 1,65,664 होते. त्यापैकी मुर्मू यांना 812 मते मिळाली. तर यशवंत सिन्हा यांना 521 मते मिळाली. आमदारांत्या मतदानानंतर दुसर्‍या फेरीच्या मतमोजणीनंतर 3219 मते मोजण्यात आली होती, ज्या मतांचे मुल्यम 8 लाख 38,839 त्यापैकी पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त म्हणजे 5 लाख 77 हजार 777 मुल्यांची 2161 मते खासदार आणि आमदारांची मते मुर्मू यांना मिळाली आहेत. तर युपीएचे उमेदवार यशवंत सिन्हा यांना 1058 इतकी मते आमदार आणि खासदारांनी दिली आहेत ज्यांचं मुल्य 2 लाख 61 हजार 62 होते. तिसर्‍या फेरीतील मतमोजणीनंतर मुर्मू यांच्या विजयाची घोषणा करण्यात आली.

17 खासदार आणि 104 आमदारांची मते फुटली
राष्ट्रपतीपदाच्या या निवडणुकीत देशभरातील एकूण 17 खासदारांची आणि 104 आमदारांची मते फुटल्याचे समोर आले आहे. या खासदारांनी एनडीए पुरस्कृत उमेदवार द्रौपदी मुर्मू यांच्या बाजूने मतदान केला. परिणामी मुर्मू शेवटपर्यंत आघाडीवर राहिल्या आणि त्यांचा विजय झाला.

COMMENTS