Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

देशभर केंद्रीय तपास यंत्रणेचा द्वेषापोटी वापर : माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण

कराड / प्रतिनिधी : गेल्या काही दिवसापासून भाजपने ईडीसह सर्वच केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर करून विरोधी पक्षातील नेत्यांना त्यांच्या पक्षात सामील

शेतकऱ्यांनो खचू नका, पूर्ण मदत करू : पालकमंत्री विजय वड़ेट्टीवार
विशेष रस्ता अनुदानाच्या 11 कोटीला नगरविकासची स्थगिती; इस्लामपूरात श्रेयवादाचे राजकारण पेटले
माहिती अधिकारी पदी हेमंतकुमार चव्हाण रुजू

कराड / प्रतिनिधी : गेल्या काही दिवसापासून भाजपने ईडीसह सर्वच केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर करून विरोधी पक्षातील नेत्यांना त्यांच्या पक्षात सामील करून घेतले. ज्यांच्या-ज्यांच्या चौकशा लावल्या त्याचे पुढे काय झाले, ते कधीच कोणाला कळाले नाही. त्यासाठी काँग्रेसने एकसंधपणे त्या सगळ्याचा सामना करत रस्त्यावर उतरून आंदोलन केले पाहिजे, असे आवाहन माजी मुख्यमंत्री, आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी केले.
सातारा जिल्हा काँग्रेसतर्फे नवसंकल्प कार्यशाळा पाचवडेश्‍वर येथे झाली. त्याच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. गृह राज्यमंत्री सतेज ऊर्फ बंटी पाटील, कृषी राज्यमंत्री विश्‍वजित कदम, युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष शिवराज मोरे उपस्थित होते. शिबिरात ज्येष्ठ विचारवंत रावसाहेब कसबे, डॉ. प्रकाश पवार, पत्रकार अमेय तिरोडकर यांनीही मार्गदर्शन केले.
गृहराज्यमंत्री पाटील म्हणाले, काँग्रेसने कायम देशहिताचा विचार केला आहे. सर्वांना सोबत घेऊन जाताना काँग्रेसची भविष्यकालीन रूपरेषा जिल्हा स्तरावरील काँग्रेस पदाधिकार्‍यांपर्यंत पोचविण्यासाठी शिबिर घेतले आहे. भारत एकसंध ठेवण्यासाठी काँग्रेस आघाडीवर आहे. मात्र, आठ वर्षांपासून ध्रुवीकरणासह समाजात तेढ निर्माण करण्याचे काम भाजप करत आहे. भाजपच्या ‘भारत तोडो’ ला काँग्रेसच्या ‘भारत जोडो’ ने उत्तर देणे गरजचे आहे. राज्यमंत्री कदम म्हणाले, सर्वांना बरोबर घेऊन जाण्याचा काँग्रेसचा विचारच देशाला तारणारा आहे. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी पुन्हा एकदा काँग्रेसचा जो नारा दिला आहे. तो प्रत्यक्षात आणण्याची जबाबदारी आपली आहे. देशासह राज्यातही पुन्हा काँग्रेसचे सरकार आणण्यासाठी एकत्रित काम करणे गरजेचे आहे.

COMMENTS