Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पोलीस निवासस्थानांच्या दुरावस्थेचा प्रश्न आ. नमिता मुंदडांनी मांडला विधीमंडळात

प्राधान्य यादीत घेऊन काम लवकर सुरु करण्याच्या उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या सूचना

अंबाजोगाई प्रतिनिधी - केज विधानसभा मतदार संघातील अंबाजोगाई, युसुफ वडगाव, नेकनूर येथील पोलीस कर्मचार्‍यांच्या शासकीय निवासस्थानांची अत्यंत दयनीय

लोहारवाडी मोरगव्हाण रस्त्यावर आढळला मृतदेह
जळगावमध्ये कंटेनर उलटल्याने दोघांचा मृत्यू
अखेर संजय राऊत यांना अटक; पत्राचाळ घोटाळयात ईडीची कारवाई

अंबाजोगाई प्रतिनिधी – केज विधानसभा मतदार संघातील अंबाजोगाई, युसुफ वडगाव, नेकनूर येथील पोलीस कर्मचार्‍यांच्या शासकीय निवासस्थानांची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. या प्रश्नाला आ. नमिता मुंदडा यांनी विधीमंडळात वाचा फोडून निवासस्थानांच्या दुरुस्तीची व नवीन निवासस्थानांबाबत मागणी केली. यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या कामाला तत्काळ प्राधान्य यादीत घेण्याच्या सूचना दिल्या.
जनतेच्या सेवेसाठी दिवसरात्र तत्पर असणार्‍या पोलिसांच्या निवासस्थानांच्या संदर्भाने आ. नमिता मुंदडा यांनी सोमवारी (दि.24) विधिमंडळात प्रश्न उपस्थित केला. केज मतदार संघातील नेकनूर, अंबाजोगाई आणि युसुफवडगाव या ठिकाणी असलेल्या पोलिसांच्या निवासस्थानांची अत्यंत वाईट परिस्थिती झाली आहे. मागील अनेक वर्षात यांची देखभाल करण्यात आलेली नाही. अनेक निवास्थानातील अधिक खोल्यांची पडझड झाली आहे. उंदीर, घुशी, साप, डुकरे तसेच मोकाट जनावरे व कुत्री यांचा येथे वावर आहे. पाण्याची योग्य व्यवस्था नसल्याने समस्यात अधिकच भर झाली आहे. एक ना अनेक समस्यांमुळे पोलिसांना कुटुंबियांसह जीव मुठीत राहण्याची वेळ आली आहे. त्यामुळे अनेक पोलीस कर्मचार्‍यांनी परवडत नसतानाही महागड्या भाड्याच्या घरात राहण्यास प्राधान्य दिले आहे. या सर्व अडचणी जाऊन घेत आ. नमिता मुंदडा यांनी विधीमंडळात पोलीस निवासस्थानांच्या दुरुस्ती व नवीन निवासस्थानांबाबत आग्रही मागणी केली. यात अगोदरच अंतर्भूत असलेल्या दोन्ही ठिकाणच्या दुरुस्ती व नवीन निवासस्थानांच्या मागणीत नेकनूरचा अंतर्भाव करावा अशी देखील मागणी केली. या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत ही कामे प्राधान्य यादीत असेल तर, हे काम लवकर सुरू होईल. नसेल तर, ते प्राधान्य यादीत घेण्याच्या सूचना महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या आहेत. याबद्दल आ. मुंदडा यांनी उपमुख्यमंत्री फडणवीस यांचे आभार मानले आहेत.

COMMENTS