Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

बीड जिल्ह्याचे भूमिपुत्र आय. पी.एस.वसंतराव परदेशी यांना अप्पर पोलीस आयुक्त पदी पदोन्नती.

शिरुर प्रतिनिधी - बीड जिल्ह्यातील शिरूर कासार शहराचे भूमिपुत्र व कुमावत बेलदार समाजाचे समाजभूषण असलेले पोलीस डिपार्टमेंटचे दबंग आय.पी.एस.अधिकारी

जमिनीच्या वादातून एकाला मारहाण
राष्ट्रवादीत मोठा भूकंप… पदाधिकारी, कार्यकर्त्यांचे सामूहिक राजीनामे…
भगवान शिवाच्या रुद्राक्षाचा महिमा अगाध ः समाधान महाराज शर्मा

शिरुर प्रतिनिधी – बीड जिल्ह्यातील शिरूर कासार शहराचे भूमिपुत्र व कुमावत बेलदार समाजाचे समाजभूषण असलेले पोलीस डिपार्टमेंटचे दबंग आय.पी.एस.अधिकारी वसंतराव किसनराव परदेशी यांची पदोन्नती होऊन त्याना अप्पर पोलीस आयुक्त (पोलीस उपमहानिरीक्षक श्रेणी) पदावर त्यांची नियुक्ती झाली आहे.

आय.पी.एस.वसंतराव किसनराव परदेशी हे पुणे जिल्ह्यातील दौंड येथिल राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक 7 येथे समादेशक म्हणून कार्यरत होते.आज शासन आदेशानुसार त्याची अप्पर पोलीस आयुक्त म्हणून पदोन्नती झाली आहे.महाराष्ट्र राज्यात पोलीस खात्यात दबंग पोलीस अधिकारी म्हणून त्यांचे कडे पाहिले जाते.या अगोदर ते छत्रपती संभाजीनगर येथे पोलीस उपायुक्त,त्यानंतर संभाजीनगर येथील संरक्षण नागरी हक्क जिल्हा पोलीस अधिकक्ष म्हणून त्यांनी पदभार सांभाळलेला आहे.नंतर वाशीम येथे जिल्हा पोलीस अधीक्षक पदाचा पदभार घेतल्या नंतर त्यानी लॉकडाऊन मध्ये उत्तमरित्या अशी कामगिरी करून कर्तव्य बजाविले होते.आणि वाशिम जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी त्यांनी उल्लेखनिय असे काम केले आहे.त्याबद्दल त्यांचे तत्कालीन मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब यांनी विशेष  विशेष असे अभिनंदन देखील केले होते.आज महाराष्ट्र राज्याच्या गृहखात्याच्या शासनाच्या आदेशानुसार पोलीस अधीक्षक श्रेणीतील भा.पो.से.अधिकार्‍यांची पोलीस उपमहानिरीक्षक श्रेणीतील पदावर नियुक्त्या केल्या आहेत.त्यामध्ये पुणे जिल्ह्यातील दौंड येथील राज्य राखीव पोलीस बल गट क्र.7 चे समादेशक असलेले आय.पी.एस.वसंतराव परदेशी यांची पिंपरी चिंचवड अप्पर पोलीस आयुक्त पदावर पदोन्नती होऊन त्यांची नियुक्ती झालेली आहे.त्याबद्दल त्याचे बीड जिल्हा वाशीयांच्या व कुमावत बेलदार समाजाच्या वतीने अभिनंदन केले आहे.

COMMENTS