Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

महात्मा बसवेश्वरांनी सामाजिक समतेची ज्योत प्रज्वलित केली-शिवलीला पाटील

अंबाजोगाई प्रतिनिधी - जगदज्योती महात्मा बसवेश्वरांनी सामाजिक समतेची ज्योत प्रज्वलित केली , असे प्रतिपादन प्रसिध्द कीर्तनकार शिवलीला पाटील यांनी य

12 वीचा केमिस्ट्रीचा पेपर फुटला | LOKNews24
नवनीत राणांविरोधात हैदराबादमध्ये गुन्हा दाखल
लिबर्टी मंडळाचा दैदिप्यमान गौरवशाली इतिहास : गिरीष इरनाक याचे गौरवोद्गार

अंबाजोगाई प्रतिनिधी – जगदज्योती महात्मा बसवेश्वरांनी सामाजिक समतेची ज्योत प्रज्वलित केली , असे प्रतिपादन प्रसिध्द कीर्तनकार शिवलीला पाटील यांनी येथे सोमवारी केले . येथील वीरशैव लिंगायत मठात विभागीय कीर्तन स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभात त्या बोलत होत्या . कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शंभूलिंग शिवाचार्य होते . यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. सिद्धेश्वर बिराजदार , डॉ . नवनाथ घुगे, डॉ. श्रीनिवास रेड्डी, डॉ. निशिकांत पाचेगावकर , माजी मुख्याध्यापक शिवकुमार निर्मळे, सुनिलकाका लोमटे, सुनिल व्यवहारे, बाला पाथरकर , बाबा महाराज, सरपंच गणेश रुद्राक्ष, उपसरपंच गारठे, अभिजीत गाठाळ, अभिजीत लोमटे ,महारूद्र आकुसकर उपस्थित होते . शिवलीला पाटील म्हणाल्या, महात्मा बसवेश्वरांनी समाजातील अंधश्रध्दा दुर करण्याचा प्रयत्न केला . युवकांनी त्यांच्या कार्याची प्रेरणा घ्यावी . आई – वडिलां च्या आज्ञेचे पालन करावे . श्रमाला माहत्व द्यावे . परिश्रमानेच जीवनात यश प्राप्त होते . शंभुलिंग शिवाचार्य म्हणाले, युवकांनी सामाजिक उपक्रम राबविले आणि महात्मा बसवेश्वरांची जयंती साजरी केली . प्रारंभी विनोद पोखरकर , महेश उरगुंडे, प्रमोद पोखरकर , बाळासाहेब खंदारे, संतोष काळे,जगदीश ढेले, गणेश काळे , मनोज बरदाळे, गौरव लामतुरे , सुनिल कलशेट्टी ,अमोल व्यवहारे , शैलेश स्वामी , प्रसाद कोठाळे , सुनिल हामने , शुभम वारद , राजू खंदारे यांनी पाहुण्यांचा सत्कार केला . या प्रसंगी किर्तन स्पर्धेतील विजयी संघांना पारितोषिक मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले . तसेच स्पर्धेचे परीक्षक प्रकाश बोरगावकर यांचाही सत्कार करण्यात आला . शंभूलिंग शिवाचार्य व इतर मान्यवरांच्या हस्ते बाळासाहेब दामा , रामलिंग भूजबळ , रमेश कापसे, धोंडिराज बुरांडे , त्रिंबक पोखरकर ,भीमाशंकर राऊत,मन्मथअप्पा कलशेट्टी यांना  समाज भूषण  पुरस्काराने  सन्मानित करण्यात आले . ग्रामिण भागातील नवनिर्वाचित लोकप्रतिनिधी महेश गारठे, मंगेश गुजर, ओमकार आकुसकर , गणेश रुद्राक्ष , शिवरुद्र आकुसकर यांचाही सत्कार करण्यात आला . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गणेश काळे यांनी केले .   कार्यक्रमा पूर्वी जेष्ठ नेते नंदकिशोर मुंदडा व माजी नगराध्यक्ष महादू मस्के यांनी महात्मा बसवेश्वरांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला. प्रसिध्द किर्तनकार शिवलीला पाटील यांच्या समाज प्रबोधनपर किर्तनाने कार्यक्रमाचा समारोप झाला .

COMMENTS