Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

बीडच्या विद्यार्थ्याची पुण्यात आत्महत्या

पुणे/प्रतिनिधी ः बीड येथून शिक्षणासाठी पुण्यात आलेल्या एका तरुणाने वसतिगृहातील खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. सदर विद

ऑनलाइन गेममध्ये हरल्यानंतर तरूणाची आत्महत्या
फायनान्स कंपनीच्या गुंडागर्दीला कंटाळून कोंढव्यातील रिक्षाचालकाची आत्महत्या
सैन्य भरतीच्या अमिषाने फसवणूक

पुणे/प्रतिनिधी ः बीड येथून शिक्षणासाठी पुण्यात आलेल्या एका तरुणाने वसतिगृहातील खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. सदर विद्यार्थ्यांनी आत्महत्या करण्यापूर्वी लिहून ठेवलेली चिठ्ठी पोलिसांना मिळाली असून त्यानुसार एका आरोपीवर चतुर्शिंगी पोलिस ठाण्यात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे अशी माहिती पोलिसांनी गुरुवारी दिली आहे.
राज गर्जे (वय- 22 )असे आत्महत्या केलेल्या मुलाचे नाव आहे. याप्रकरणी त्याचे वडील रावसाहेब प्रल्हाद गर्जे (वय- 49, रा. पाटस, ता. आष्टी, जिल्हा बीड) यांनी निरूपम जयवंत जोशी या आरोपी विरोधात पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. राज गर्जे हा मराठवाडा मित्र मंडळ लॉ कॉलेज डेक्कन येथे तिसर्‍या वर्षात शिक्षण घेत होता. गोखलेनगर येथील एका वसतिगृहात तो राहण्यास होता. त्याच्या ओळखीचा मुलगा निरुपम जोशी यानी त्यास अज्ञात कारणावरून त्रास देऊन आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याने, राज याने वसतिगृहाच्या रुममध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. आत्महत्येपूर्वी मित्राच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करत असल्याची चिठ्ठी पोलिसांना मिळून आली आहे. याबाबत चतुर्शिंगी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बालाजी पांढरे यांनी सांगितले की, राज गर्जे हा विद्यार्थी होता. त्यांनी मित्रासोबत 50 हजार रुपयांचा आर्थिक व्यवहारात मध्यस्थी केली होती. मात्र, संबंधित पैसे दिले जात नसल्याने त्याने आत्महत्या केली आहे. याबाबत पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक एस कोळी पुढील तपास करत आहेत.

COMMENTS