Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

फायनान्स कंपनीच्या गुंडागर्दीला कंटाळून कोंढव्यातील रिक्षाचालकाची आत्महत्या

पुणे प्रतिनिधी - फायनान्स कंपनीच्या गुंडागर्दीला कंटाळून कोंढव्यातील एका रिक्षाचालकाने व्हिडिओ टाकून इमारतीवरुन उडी मारुन आत्महत्या केली. तोह

मराठा आरक्षणसाठी तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या
टाकरवण येथील नारायण उंडे ची गळफास घेऊन आत्महत्या
विद्यार्थ्याची गळफास घेऊन आत्महत्या

पुणे प्रतिनिधी – फायनान्स कंपनीच्या गुंडागर्दीला कंटाळून कोंढव्यातील एका रिक्षाचालकाने व्हिडिओ टाकून इमारतीवरुन उडी मारुन आत्महत्या केली. तोहीद मेहबूब शेख (वय २७, रा. कौसरबाग, कोंढवा) असे या तरुणाचे नाव आहे. ही घटना गुरुवारी सकाळी सव्वा आठ वाजता घडली. याबाबत बघतोय रिक्षावाला संघटनेचे अध्यक्ष डॉ. केशव क्षीरसागर यांनी सांगितले की, तोहिद शेख या रिक्षाचालकाने सध्य परिस्थितीमध्ये व्यवसाय होत नसल्याने त्याच्या रिक्षाचे हप्ते थकले होते. फायनान्स कंपनीच्या गुंडागर्दीला कंटाळून त्याने हप्ता भरायला सावकाराकडून पैसे घेतले. त्याच्या विळख्यात तो अडकला. फायनान्स कंपनीच्या गुंडानंतर सावकार त्याला त्रास देऊ लागले. घरी घेऊन कुटुंबियासमोर अपमानित करु लागले. शेवटी हा अपमान व संघर्ष सहन न होऊन त्याने एक व्हिडिओ बनवला. तो “बघतोय रिक्षावाला कोंढवा” ग्रुपवर टाकला. त्यानंतर बांधकाम सुरु असलेल्या इमारतीवरुन उडी मारुन गुरुवारी सकाळी सव्वा आठच्या सुमारास आत्महत्या केली. त्याने उडी मारल्यानंतर त्या अत्यवस्थ अवस्थेत कोणीतरी त्याचा मोबाईल मिळवून त्याने टाकलेला व्हिडिओ ग्रुपवरुन डिलीट केला. मात्र, तोपर्यंत इतर ग्रुपवर टाकण्यात आला असल्याने तो रिक्षाचालकांकडे उपलब्ध आहे. या रिक्षाचालकाला दीड दोन वर्षाचा मुलगा, मुलगी व पत्नी असून त्यांना न्याय मिळावा, अशी मागणी आम्ही करीत असल्याचे डॉ. केशव क्षीरसागर यांनी केली आहे. या घटनेची माहिती मिळताच कोंढवा पोलिसांनी घटनास्थळी घेतली असून अधिक तपास सुरु आहे.

COMMENTS