कोपरगाव ः कोपरगाव शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीत सुभाषनगर उपनगरात रहिवासी असलेले फिर्यादी दिपक भास्कर खंडांगळे वय-42) यांनी आरोपी यांना,तुम्ही फटाके

कोपरगाव ः कोपरगाव शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीत सुभाषनगर उपनगरात रहिवासी असलेले फिर्यादी दिपक भास्कर खंडांगळे वय-42) यांनी आरोपी यांना,तुम्ही फटाके वाजू नका माझे अंगावर येतात असे म्हणाल्याचा राग येऊन आरोपी शुभम सोमनाथ पवार,सोमनाथ पवार,करणं भंडारी,व एक अनोळखी मुलगा आदींनी रात्री 12.30 वाजेच्या सुमारास फिर्यादीच्या डोक्यात कडे मारून त्यास जखमी करून त्यास व त्यातील साक्षीदार आदींना लाथा बुक्क्यांनी मारहाण करून जखमी केले असल्याचा गुन्हा नुकताच दाखल झाला आहे.त्यामुळे कोपरगाव शहरात खळबळ उडाली आहे.
कोपरगाव शहरातील संजयनगर येथे काही तरुण फटाके वाजवत असताना फिर्यादी दिपक अडांगळे यांनी वरील आरोपी यांना त्यास विरोध केला होता याचा राग येऊन आरोपी शुभम सोमनाथ पवार,सोमनाथ पवार,करणं भंडारी,व एक अनोळखी मुलगा (नाव गाव माहिती नाही) आदींनी दि.13 नोव्हेंबर रोजी रात्री 12.30 वाजेच्या सुमारास फिर्यादीच्या डोक्यात कडे मारून त्यास जखमी करून त्यास व त्यातील साक्षीदार आदींना शिवीगाळ करून लाथा बुक्क्यांनी मारहाण करून जखमी केले असून फिर्यादीस जीवे मारण्याची धमकी दिली असल्याचा गुन्हा नुकताच दाखल झाला आहे. या प्रकरणी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रं.529/2023 भा.द.वि.कलम 324,323,504,506,34 प्रमाणे आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रदीप देशमुख यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस हे.कॉ.अर्जुन दारकुंडे हे करीत आहेत.
COMMENTS